Even in the scorching sun, there is a throng of tourists on the banks of the Godavari river esakal
नाशिक

Nashik News: गांधी तलावालगत फुलतेय चौपाटी! बोटिंगला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; सायंकाळी परिसर ‘हाऊसफुल्ल’

Nashik News : नाशिकची चौपाटी (गांधी तलाव परिसर) सायंकाळी ‘हाऊसफुल्ल’ होवू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाशिवरात्रीला जोडून आलेल्या सलग सुट्या. गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे खळाळून वाहणारी गोदा, सोबतीला थंड हवेची नाशिककरांसह बाहेरून आलेल्या पर्यटकांना भुरळ पडू लागली आहे. त्यामुळे नाशिकची चौपाटी (गांधी तलाव परिसर) सायंकाळी ‘हाऊसफुल्ल’ होवू लागला आहे. (Nashik Chowpatty blooming next to Gandhi Lake marathi news)

गांधी तलावात बोटींगची सैर करत असलेले पर्यटक.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पहाटेच्या सुखद गारव्यानंतर दुपारी उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यापासून सुटका करून घेण्यासाठी गोदाघाटावरील सायंकाळच्या गर्दीत वाढ होऊ लागली आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून खळाळून वाहणाऱ्या गोदापात्रानेही अनेकांना आकर्षित केले आहे. गांधी तलावालगत सायंकाळच्या सुमारास भेळ, पाणीपुरी, पॅटिस, चायनीज विक्रेते मोठ्या संख्येने दाखल होतात. सद्या गांधी तलावालगत मोठी गर्दी उसळत आहे.

बोटिंगची सर्वांना भुरळ

आवर्तनानंतर गांधी तलावही खळाळून वाहात असल्याने येथील बोटिंगचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. यात चिमुरड्यांपासून ज्येठ्यांचाही मोठा सहभाग असतो. महापालिकेने येथील बोटिंगचा खासगी ठेका दिला असून त्यांच्यामार्फत वल्हविणे, पायडल बोटीसह यांत्रिक बोटीची व्यवस्था केली असून प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत.

गांधी तलावाच्या एका बाजूने ते थेट अहिल्यादेवी होळकर पुलालगत या फेऱ्या पर्यंटकांचा आनंद वाढवित आहेत. याठिकाणी रिमोट कार ठेवण्यात आल्या असून एका फेरीसाठी पन्नास रुपये आकारले जातात. त्याद्वारे बच्चे कंपनी मनमुराद आनंद लुटत आहेत. (Latest Marathi News)

जीवरक्षक दल सज्ज

गेल्या कित्येक दिवसांच्या खंडानंतर प्रथमच खळाळून वाहणाऱ्या गोदापात्रात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी दुपारनंतर गर्दी उसळत आहे. गांधी तलाव, रामतीर्थ व त्याखालील कुंडांमध्ये स्नानासाठी गर्दी उसळत आहे. गांधी तलावात सद्या अधिक पाणी असल्याने रामतीर्थावरील जीवरक्षक दलाचे कार्यकर्तेही सज्ज आहे.

गोदाआरतीची भुरळ

सायंकाळी सातला गोदावरीची महाआरती होते. गेल्या काही दिवसांपासून हा सोहळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी उसळते. विशेष म्हणजे पुरोहित संघ गोदावरी सेवा समितीतील वादानंतर गोदाआरतीसाठी दुप्पट गर्दी होऊ लागल्याचे दोन्हीकडील पदाधिकारीही खासगीत मान्य करतात. कारण यापूर्वीच्या गोदाआरतीत मोजकेच लोक दिसत. परंतु सद्या गोदाआरतीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. त्यातच गोदाआरतीचे आकर्षक युवा वर्गातही वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT