Electricity Supply  esakal
नाशिक

Nashik Electricity Supply : सिडकोत आजपासून 18 मेपर्यंत सायंकाळी 4 पर्यंत वीजपुरवठा बंद

Electricity Supply : विद्युत वाहिनीच्या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती कामासाठी १५ ते १८ मेपर्यंत कालावधीमध्ये रोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत बंद राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Electricity Supply : महावितरण सिडको उपविभागातील विविध विद्युत वाहिनीच्या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती कामासाठी १५ ते १८ मेपर्यंत कालावधीमध्ये रोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत बंद राहणार आहे. यामध्ये झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती यासह इतर महत्त्वाची कामे करण्यात येणार आहे. ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग एककडून करण्यात आले आहे. ( Cidco electricity supply off from today till 18th May till 4 pm )

१५ मेस गोविंदनगर विद्युत वाहिनीवरील प्रताप चौक, पांगरे मळा, कुबेर लॉन्स, पाण्याची टाकी तसेच परिसर, १६ मे लेखानगर विद्युत वाहिनीवरील राणाप्रताप चौक, औदुंबर बस स्टॉप, प्रभात कॉलनी, स्टेट बँक, लाइफ केअर रुग्णालय, शिवाजी भाजी मार्केट, बुरकुलेनगर, पांगरे मळा तसेच परिसर, प्रकाश विद्युत वाहिनीवरील विश्वास बँक, चंद्रावेल, सुनील मेडिकल, शारदा निकेतन, इंदिरानगर बोगदा, दत्ता टायर तसेच परिसर, १७ मे सदगुरुनगर विद्युत वाहिनीवरील गणपती मंदिर, सागर स्वीट, मनोहरनगर, सदगुरू.

सदाशिव नगर, चर्च लाईन, काशिकोनगर तसेच परिसर, पिंपरीकर विद्युत वाहिनीवरील बीएसएनएल चौक, पिंपरीकर रुग्णालय, पाटील क्लासिक, रिलायन्स अपार्टमेंट, अश्विनी रुग्णालय, जॉगिंग ट्रॅक तसेच परिसर. १८ मेस सिडको विद्युत वाहिनीवरील अंबड एमआयडीसी मारीगो इमारत, उपेंद्रनगर, उत्तमनगर कॉलेज, महाकाली चौक तसेच परिसरात वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT