फराळच्या गोडव्यानंतर आता मांसाहारावर ताव  sakal media
नाशिक

फराळच्या गोडव्यानंतर आता मांसाहारावर ताव

- युनूस शेख

नाशिक : दिवाळीनिमित्त गेल्या आठ दिवसापासून फराळ विविध मिठाईच्या गोडव्यानंतर आता मांसाहारावर ताव मारला जात आहे. मासे विक्रेत्यांपासून ते चिकन विक्रीच्या दुकानावर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे.

दिवाळी म्हटले की सर्वत्र आनंदोत्सव असतो. घरोघरी विविध प्रकारचे फराळ तयार केले जातात. सर्व बांधव एकमेकांच्या घरी जाऊन दीपावलीच्या शुभेच्छा देतात. या वेळी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मिठाईने करत त्यांचे तोंड गोड केले जाते. त्याचप्रमाणे एकमेकांना भेट वस्तूसह मिठाईचा बॉक्स दिला जातो. इतकेच नव्हे तर कामगार वर्गासदेखील त्यांच्या मालकांकडून मिठाई दिली जाते. घरी येणारे पाहुणेदेखील रिकाम्या हाती न येता मिठाई घेऊन येतात. त्यामुळे दिवाळीत आठ दिवस सतत फराळ आणि मिठाईचे सेवन केल्याने तोंडाचा गोडवा वाढला आहे. आता प्रत्येकाची काहीतरी चटकदार आणि खमंग खाण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे सर्वांचा कल मांसाहार सेवनाकडे झाला आहे. बहुतांशी नागरिकांनी मांसाहाराचा पाहुणचार करण्यास पसंती दर्शवली. घरोघरी मासे, चिकन, मटण अशा विविध प्रकारच्या मांसाहार खमंग असा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. दिवाळी सुट्टीचे औचित्य साधत पर्यटनस्थळी भेट देत आनंद साजरा करणाऱ्यांनीदेखील मांसाहाराचे पार्सल बरोबर घेऊन जात आहे. त्याचप्रमाणे काहींनी शहरातील विविध विशेषतः जुने नाशिक परिसरातील मांसाहाराच्या हॉटेल्समध्ये जेवणासाठी गर्दी केल्याचे बघावयास मिळत आहे.

केटरर्सकडे लगबग

तरुणांकडून दिवाळीच्या मिठाईचा गोडवा घालवण्यासाठी मांसाहाराच्या पार्टीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. केवळ मांसाहार तयार करणाऱ्या केटर्सच्या दुकानावर बिर्याणी, मटण भाजी, पुलाव अशा विविध पदार्थ तयार करून घेण्यासाठी गर्दी करत आहे. पुढील पाच ते सहा दिवस अशाच प्रकारचे मांसाहारी पदार्थ मागणी असणार आहे. त्यामुळे काही दिवस तरी केटरर्स व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे भासत आहे.

"दिवाळीचे पाच ते सहा दिवस व्यवसायात मंदी होती. त्या तुलनेत रविवारपासून मांसाहारास मागणी वाढली आहे."

- विजय डांगळे, मासे विक्रेता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Nivadnuk: निवडणुकीचा 'Social' प्रचार! इन्फ्लुएन्सर्स बनले आधुनिक प्रचारदूत; राजकीय रणधुमाळीत कशी करतात कमाई?

Surbhi Jyoti : कुबूल है फेम सुरभी ज्योती अडकणार विवाहबंधनात ; 'या' ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

Navi Mumbai: नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ, दैनंदिन प्रवासी संख्या २० हजारांच्या घरात

IAS Shailbala Martin : 'मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण...'; महिला IAS आधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत, वाद पेटण्याची शक्यता

16 children statement: काय चाललंय? लोकांनी 16 अपत्यांचा विचार करावा, चंद्राबाबू नायडूंनंतर आता 'या' मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला

SCROLL FOR NEXT