Vote  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नागरीकांनी सुटी नव्हे डयुटी समजुन मोठ्या संख्येने मतदान करावे; पोलीस अधीक्षक देशमाने यांचे आवाहन

Lok Sabha Election : नाशिक जिल्हयातील नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघ निवडणुक मतदान प्रक्रिया ही दि. २०/०५/२०२४ रोजी पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. निवडणुक आयोग भारत सरकार यांचे निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ प्रक्रिया देशात सुरू आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया नाशिक जिल्हयात पार पाडली जात आहे. (Nashik Lok Sabha Election)

नाशिक जिल्हयातील नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघ निवडणुक मतदान प्रक्रिया ही दि. २०/०५/२०२४ रोजी पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात एकुण १२ विधानसभा मतदारसंघाचा समावेश असुन त्यानुसार मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडून खालीलप्रमाणे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

- ०१ पोलीस अधीक्षक व ०२ अपर पोलीस अधीक्षक

- १३ पोलीस उपअधीक्षक व ३५५ पोलीस अधिकारी

- ५८०० पोलीस अंमलदार

- ३३०० होमगार्डस्

- एस.ए.पी.एस. दलाच्या एकुण १० कंपनी

- एस.आर.पी.एफ. च्या ०२ कपांनी

लोकसभा निवडणुक २०२४ व्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे वरील प्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हयाच्या सीमावर्ती भागात १३ आंतरराज्य व ०९ आंतरजिल्हा चेक पोस्ट लावण्यात आलेले आहे, तसेच पेट्रोलिंगकरीता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय ०५ पथके कार्यरत असणार आहेत. अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी ४० भरारी पथके देखील तैनात आहेत. (latest marathi news)

लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर ग्रामीण पोलीसांनी अवैधरित्या मद्याची वाहतुक व विक्री करणा-या इसमांवर दारूबंदी कायद्यान्वये एकुण १२९२ गुन्हे दाखल करून ९१,३०६ लिटरचा अवैध मद्यसाठा असा एकुण १,२८,१८,०८७/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हयावे सीमावर्ती भागातुन, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर तसेच स्थानिक स्थरावर अवैधरित्या मद्याची वाहतुक.

अवैध शस्त्रे तसेच अवैधरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणा-यांवर सत्वर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हॉटेल, ढाबे व इतर ठिकाणांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणा-यांवर देखील कारवाई सुरू आहे. जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, गावगुंड यांच्या हालचालींवर पोलीसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे.

सदरची मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हयातील नागरीकांनी सुटी नव्हे डयुटी समजुन मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT