नाशिक : गेल्या आठवडाभरात शहरातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकेदेखील प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. सातत्याने होणार्या चोरीच्या घटनांची मात्र पोलिसांकडून उकल होत नसल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली आहे. तर पोलीस यंत्रणा ढिम्म असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. (nashik Stealing of passengers jewelry is happening regularly marathi news)
सुनिता रवींद्र सिनलकर (५१, रा. बांगरनगर, भिवंडी, ठाणे) या मंगळवारी (ता. १९) मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक येथे आल्या होत्या. त्यांना ठाण्याला जायचे होते. दुपारी साडेबारा एकची वेळ होती. बसस्थानकात मुंबईकडे जाणार्या बसेससाठी गर्दी होती. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने श्रीमती सिनलकर यांच्या पर्समधील ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेत चोरी केली.
सदरची बाब त्यांना उशिराने लक्षात आली. याप्रकरणी श्रीमती सिनलकर यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात राज्य परिवहन महामंडळाचे जुने मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस), ठक्कर बाजार बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक असे तीन मुख्य बसस्थानक आहेत. या तिन्ही बसस्थानकांमध्ये प्रवाशांची नेहमीच गर्दी असते.
या गर्दीचा गैरफायदा घेत याठिकाणी चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने, बॅगेत ठेवलेल्या पर्समधील दागिने, पुरुषांच्या गळ्यातील दागिने असा ऐवज सर्रासपणे लंपास केला जातो. तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. परंतु अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीची शंका आहे.
महिलांच्या टोळ्या सक्रिय
बसस्थानकांमध्ये महिला प्रवासी हेरून गर्दीच्या वेळी अचानक संशयित महिलांचे टोळके त्या प्रवासी महिलेभोवती गर्दी करतात. प्रवासी असल्याचे भासवून प्रवासी महिलेच्या गळ्यातील वा पर्समधील दागिने हातचलाखीने लंपास करतात. ऐवज हाती लागताच टोळके बसस्थानकातून पसार होते. अशी या महिला टोळक्याची मोडस् आहे. शहरातील नाशिकरोड, महामार्ग, ठक्कर बाजार, मेळा आणि सीबीएस बसस्थानकांमध्ये अशा टोळ्या सक्रिय असून, या टोळ्या परजिल्ह्यातील आहेत. यात लहान मुलींचाही समावेश असल्याचे यापूर्वी निष्पन्न झालेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.