Nashik Police Commissioner Sandip Karnik esakal
नाशिक

SAKAL Exclusive : अमली पदार्थांविरोधात शहर पोलिस ‘अलर्ट’! पोलिस आयुक्त आक्रमक

Nashik Police Alert : पुण्यात पुन्हा लाखोंचा एमडीचा साठा जप्त करण्यात आल्याने नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Alert : पुण्यामध्ये पुन्हा कोट्यवधींचा एमडी (मेफेड्रॉन) साठा जप्त करण्यात आले आहे. या कारवाईसंदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner) यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचे सोशल मीडियावरून कौतूक करत नाशिक पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देताना यापूर्वीच्या एमडीच्या गुन्ह्यांसंदर्भात नव्याने आढावा घेत शहरातील संशयास्पद ‘अड्ड्यां’ ना लक्ष्य करण्याचे आदेश दिले. (Nashik City police alert against drugs marathi news)

पुण्यात पुन्हा लाखोंचा एमडीचा साठा जप्त करण्यात आल्याने नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरात छुप्यापद्धतीने अमली पदार्थांची विक्री सुरू असल्यास तत्काळ कारवाईचे आदेश देतानाच, संशयास्पद ठिकाणांवर ‘वॉच’ ठेवून कारवाई करण्याचेही आदेश बजावले आहेत.

त्याचप्रमाणे, पोलिसांकडून अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये नव्याने परवाने दिलेल्या केमिकल कंपन्या व शिंदे गावप्रमाणेच शहरालगत सुरू असलेल्या खासगी औद्येागिक वसाहतीतील गोदामांची माहिती संकलित करण्यात येत आहेत. तसेच, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, शहरालगतचे ढाब्यांची तपासणी करताना अमली पदार्थ विक्रीची संशयास्पद ठिकाणांची माहिती संकलित करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

गेल्या वर्षी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. त्यानंतर त्याचे नाशिकमध्ये दोन कारखाने पोलिसांनी शोधून उदध्वस्त केले. त्यापाठोपाठ नाशिक गुन्हे शाखेने सोलापूरात कारवाई करीत दोन एमडीचे कारखाने उध्वस्त करीत लाखोंचा साठा जप्त केला होता.

नाशिकमध्ये एमडीचे चार गुन्हे गेल्या वर्षी दाखल झाले होते. यात ललित पाटील टोळीतील संशयित पुणे आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, नाशिक पोलिसांनी सनी पगारे टोळीला जेरबंद करीत एमडीचे मोठे रॅकेट उदध्वस्त केले. वडाळागावातील छोट्या भाभीचे एमडी रॅकेटही उदध्वस्त केले. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी दोन मुंबईहून एमडी आणून नाशिकमध्ये विक्री करताना ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

असे आहेत आदेश

- औद्योगिक वसाहतीत नव्याने परवाने दिलेल्या कंपन्यांची माहिती संकलन

- औद्योगिक वसाहतींमध्ये सुरू असलेल्या केमिकल, ॲग्रो कंपन्यांची माहिती संकलन

- गोदामांमध्ये साठवून ठेवलेल्या मालाची माहिती

- शहरालगतच्या खासगी औद्योगिक वसाहतीत नव्याने सुरू कंपन्या, गोदामांची तपासणी

- शहरातील संशयास्पद अड्ड्यांवर करडी नजर

- हॉटेल्स, ढाब्यांची नियमित तपासणी

- आयुक्तालयाच्या ९९२३३२३३११ या व्हॉटसॲप हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन

"शहरात यापूर्वी एमडीचा साठा सापडलेला आहे. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये यासाठी त्याविरोधात कडेकोट नियोजन केले आहे. पोलिसांकडून विशेष कारवाईअंतर्गत शहरभर नजर ठेवली जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद वाटल्यास आमच्या माहिती द्यावी."

- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT