Civil Services esakal
नाशिक

Civil Services Joint Prelims : नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला! कृषी सेवेचा समावेश, 782 पदांसाठी भरती

Latest Education News : १ डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. कृषी सेवेतील पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत करावा, या उमेदवारांच्‍या मागणीलाही मान्‍यता देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२४ च्‍या सुधारित तारखेची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्यात आली आहे. १ डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. कृषी सेवेतील पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत करावा, या उमेदवारांच्‍या मागणीलाही मान्‍यता देण्यात आली. त्‍यामुळे आता ७८२ पदांच्‍या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. (Civil Services Joint Prelims on December 1)

बहुतांश सर्व स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रक सुरळीत पार पडत असताना २०२४ मध्ये काही परीक्षांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबतही ‘तारीख पे तारीख’ पडत होती. कधी तांत्रिक अडचणी, तर कधी उमेदवारांच्‍या मागणीनुसार परीक्षेच्‍या तारखेत बदल करण्यात आला. आता परीक्षेच्‍या सुधारित तारखेची घोषणा झाल्‍याने उमेदवार जोमात अभ्यासाला लागले आहेत.

पदसंख्येत झाली वाढ

परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ ला विविध संवर्गांतील २७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यानंतर ८ मे २०२४ ला एकूण ५२४ पदांचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले होते. ही जाहिरात प्रसिद्ध केल्‍यावर शासनाच्‍या कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाने १६ ऑगस्‍ट २०२४ ला २५८ पदांचे मागणीपत्र सादर केले; परंतु तेव्‍हा परीक्षेची तारीख जवळ असल्‍याने ऐन वेळी या पदांचा समावेश करण्यास आयोगाने नकार दिला होता. (latest marathi news)

यानंतर उमेदवारांनी रेटा लावून धरल्‍यावर शासनाने या पदाच्‍या समावेशासाठी आयोगाला विनंती केली. त्‍यातच परीक्षाही पुढे ढकलली गेल्‍याने आता या पदांचाही भरती प्रक्रियेत समावेश केला आहे. त्‍यामुळे आता ७८२ पदांच्‍या भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल.

आता आचारसंहितेचा खोडा

यापूर्वी विविध कारणांनी परीक्षेच्‍या जुलै, ऑगस्‍टमधील नियोजित तारखा हुकल्‍यावर सुधारित वेळापत्रकाची राज्‍यभरातील उमेदवारांना प्रतीक्षा होती. त्‍यातच कृषी सेवेंतर्गत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, नव्‍याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्‍या संख्येनुसार परीक्षेचे नियोजन यासह आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम आदी बाबींचा विचार करून सुधारित तारीख ठरविली आहे. या कारणांमुळे आता पूर्व परीक्षा थेट डिसेंबरमध्ये होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT