NMC News  esakal
नाशिक

Nashik News : नाशिकच्या स्वच्छ हवेत होणार सुधारणा; वित्त आयोगाकडून २२ कोटी

विक्रांत मते

नाशिक : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगामार्फत नाशिक महापालिकेला २२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर, भगूर नगरपरिषदेला १३. ९१ लाख व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला ९६.१२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. (Nashik clean air will improve 22 crores from Finance Commission Nashik News)

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान राबविले जाते. यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात हवेची गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी निधी दिला जातो. यंदाच्या अभियानात राज्यातील नाशिकसह १२ महापालिकांना निधी मिळाला आहे.

यामध्ये नाशिकसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी व चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, वसई, विरार या महापालिकांचा समावेश आहे. तर, अंबरनाथ व बदलापूर या दोन नगरपालिका भगूर व वाडी या दोन नगरपरिषद. पुणे, देहूरोड, खडकी देवळाली व औरंगाबाद या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे.

नाशिक महापालिकेला २२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून हवेचे गुणवत्ता सुधारण्यासाठीच निधी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने कृती आराखडा निश्चित केला आहे. वाहतूक बेटांवर प्रदूषण मापक यंत्र बसविणे, इंधनामधील भेसळ तपासणीदेखील केली जाणार आहे.

यासाठी संबंधित विभागाकडे निधी वर्ग करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महाजनको, अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलिस, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ या शासकीय कार्यालयांच्या अधिकार क्षेत्रानुसार कृती आराखडा अमलात आणण्याच्या सूचना आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

कृती आराखड्यानुसार या उपाययोजना

- प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई करणे.
- औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेवर नियंत्रण ठेवणे.
- नवीन बांधकामांना ग्रीन नेट लावणे.
- जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घालणे.
- नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करणे.
- रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे.
- इंधनातील भेसळ रोखणे.
- इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविणे.
- अवजड वाहनांची वाहतूक बाह्य मार्गाने वळविणे.
- सेन्सर द्वारे सल्फर डाय ऑक्साईड ची तपासणी करणे.
- एकीकृत सिग्नल यंत्रणा उभारणे.
- दुभाजकांमध्ये झाडे लावणे व कारंजे उभारणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT