Staff monitoring railway station through CCTV at RPF office. esakal
नाशिक

Nashik News : आरपीएफकडून रेल्वे स्टेशनचे सूक्ष्म निरीक्षण! अधिकाऱ्यांच्या मदतीला 86 CCTV कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईमुळे सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी आहे. यामुळे प्रवाशांचे सामान चोरीला जाऊ नये, अघटित घटना घडू नयेत तसेच गुन्हेगारीला चाप बसावा, या उद्देशाने नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आरपीएफच्या कार्यालयात सध्या अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्हीद्वारे खडा पहारा देत आहेत. (Nashik Close inspection of railway station by RPF )

संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळल्यास तत्काळ बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे कळवले जाते. परिस्थितीची पाहणी केली जाते. नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन, तीन, चारवर सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सूक्ष्म नियंत्रण केले जात आहे. प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी असल्यास ते गर्दीचे नियोजन आरपीएफचे कर्मचारी करतात.

शिवाय ठिकठिकाणी ८६ सीसीटीव्ही बसवलेले आहेत. या सीसीटीव्हींद्वारे सूक्ष्म पद्धतीने प्रवाशांचे व तेथील परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेर कॅमेरे बसवलेले असून सरकते जिने, प्रवेशद्वार, तिकीट घर, प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते चार लिफ्टबाहेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. (Latest Marathi News)

त्यामुळे परिसराचे निरीक्षण करणे सोपे जात आहे. लग्नसराईमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीचे नियोजन आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी सामंजस्याने केल्याचे प्रवाशांनी सांगितले.

"नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आम्ही सूक्ष्म नियोजन करीत असतो. २७ तास आमचा गार्ड परिस्थितीवर देखरेख ठेवतो. लग्नसराईत मोठी गर्दी होती आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे. तरीही आम्ही सूक्ष्म निरीक्षण करून परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ८६ कॅमेरे सध्या कार्यरत असून त्याची स्क्रीनिंग आम्ही पाहतो."- हरपूलसिंग यादव, पोलिस निरीक्षक, आरपीएफ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT