The signal, which was also off in the evening, has been restarted in the evening. Due to this, the traffic system has also become smooth. esakal
नाशिक

SAKAL Impact : बंद असलेले सिग्नल पुन्हा सुरू!

Nashik News : कडक उन्हामुळे शहरातील काही सिग्नल दुपारच्या वेळी बंद करण्यात आले होते. परंतु बंद केलेले सिग्नल पुन्हा सायंकाळी सुरू करण्याचाच विसर वाहतूक पोलीस अंमलदारांना पडला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कडक उन्हामुळे शहरातील काही सिग्नल दुपारच्या वेळी बंद करण्यात आले होते. परंतु बंद केलेले सिग्नल पुन्हा सायंकाळी सुरू करण्याचाच विसर वाहतूक पोलीस अंमलदारांना पडला होता. यासंदर्भातील वृत्त ‘दैनिक सकाळ’ मधून प्रसिद्ध होताच, बंद केलेले सिग्नल दुपारी ठराविक वेळ वगळता पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. (Closed Signal resumes)

यंदा कडक उन्हाळ्यामुळे नाशिककरांची लाही-लाही झाली आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन असल्याने रस्तेही सुनसान असतात. यामुळे शहर वाहतूक शाखेने रहदारीच्या रस्त्यावरील सिग्नल वगळता शहरातील उपरस्त्यावरील सिग्नल यंत्रणा दुपारी १२ ते ४ यावेळेत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वाहतूक अंमलदारांकडून सिग्नल बंद ठेवले जात होते.

मात्र चार वाजेनंतर बंद केलेले सिग्नल पुन्हा सुरू करण्याची आवश्यक असताना वाहतूक पोलीस अंमलदारांकडून सिग्नल सुरू करण्याचाच बहुदा विसर पडत असावा. मात्र सिग्नल बंदमुळे अशावेळी अपघाताची शक्यता वाढली होती. यासंदर्भातील वृत्त ‘दैनिक सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ६) प्रसिद्‌ध झाले होते. (latest marathi news)

या वृत्तात एम.जी. रोडवरील सांगली बँक सिग्नल, शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल आणि जुने पोलीस आयुक्तालयाचा सिग्नल बंद सायंकाळच्या वेळी बंद असल्याचे छायाचित्रही प्रसिद्‌ध केले होते. या बातमीची वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी.

सरकारवाडा विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी गांभीर्याने दखल घेत, अंमलदारांना तातडीने सिग्नल यंत्रणा नियमित सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सदरील सिग्नल दुपारीची कडक उन्हाची वेळ वगळता नियमित सुरू करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत सुरू झाली आहे.

"उपरस्त्यावरील सिग्नल दुपारी बंद करणे आणि नंतर पुन्हा चालू करणे आवश्यक आहे. तशा सूचना अंमलदारांना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व सिग्नल सकाळी आणि सायंकाळी सुरू राहतील." - दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा - २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT