Nashik News : अलीकडच्या काळात धरण क्षेत्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर धरण क्षेत्र परिसर भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असल्यामुळे एवढ्या सर्व परिसरावर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण कसे ठेवायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. (collective effort is required for security in dam area)
यामुळे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित समन्वयाने ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठ दिवसांत नदी व धरण क्षेत्रामध्ये दहापेक्षा जास्त पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. भावली धरणामध्ये नाशिक रोड येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला. तसेच सिन्नर तालुक्यातील दोघांचा व त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जलसंपदा विभागाकडे धरणांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र धरण सुरक्षा ही जबाबदारी सर्वांची आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कडील ही यंत्रणा मर्यादित स्वरूपाची आहे व इतका मोठा परिसर असल्यानंतर त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यावरही काही मर्यादा पडतात. (latest marathi news)
धरण क्षेत्राचा परिसर अत्यंत मोठा असल्यामुळे कोण कोठून धरणामध्ये प्रवेश करेल, याचा अंदाज येत नाही. तत्कालीन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी धरण क्षेत्र परिसरात पर्यटक प्रामुख्याने जिथे भेटी देतात त्या भागात सुरक्षा रक्षक तैनात केले होते. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ही उपाययोजना बासनात गुंडाळली गेली आहे. धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी ही नित्य नियमाची आहे. त्यामुळे येथे पोलिस विभागाची भूमिका महत्त्वाची आहे.
"भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या परिसरावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी काही मर्यादा आहेत. धरण परिसराच्या सर्व क्षेत्रात सुरक्षा वाढवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. पर्यटकांनीही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. सध्या धरणातील पाणीसाठा कमी आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे कमी लोक भेट देतात. या अगोदरही सावधगिरी बाळगावी, असे फलक लावले होते. आता पुन्हा नव्यानेही सूचना फलक लावू." - सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.