Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी २० मेस मतदान होणार आहे. तत्पूर्वी, सलग दोन दिवस शासकीय सुट्या असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सलग सुट्यांना लागून मतदान घेऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. (Nashik Election Commission should not be held during consecutive holidays )
यंदा किमान देशाच्या सरासरीइतके मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सरासरी किमान ७० टक्के मतदान व्हावे, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकसह दिंडोरी आणि धुळे येथील मतदानाच्या दोन दिवस आधी शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (ता. १९) सार्वजनिक सुट्या आहेत. सोमवारी (ता. २०)ही सरकारने मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली. (latest marathi news)
शाळा, महाविद्यालयांनाही सुटी असल्याने नोकरदार वर्ग सलग सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. अनेकांनी त्यासाठीचे बुकिंगही सुरू केले. वाढते ऊन आणि सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी सलग सुट्या व उन्हाच्या तडाख्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा कमी मतदान होण्याची भीती प्रशासन व्यक्त करीत आहे.
मतदानाची आठवण ठेवा
बाहेरगावी जाण्यासाठी नागरिक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसला पसंती देतात. अशा ट्रॅव्हल्स कंपन्यांशी जिल्हा प्रशासन संपर्क साधत आहे. मतदानाच्या दिवशी किंवा त्यापूर्वीचे दोन-तीन दिवस आधी बसमधील शीट आरक्षित करण्यासाठी येणाऱ्यांना २० मेस मतदान असल्याची आठवण करून द्या, अशी विनंती प्रशासनाकडून केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.