Collector Jalaj Sharma esakal
नाशिक

Nashik News : मोफत उपचारांसाठी कुणालाही पैसे देऊ नका : जिल्हाधिकारी

Nashik : मोफत उपचारांकरिता पैसे आकारणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शासन नियुक्त योजना समन्वयकांकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मोफत उपचारांकरिता पैसे आकारणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शासन नियुक्त योजना समन्वयकांकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना केले आहे. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात पुढे आला. (Nashik Collector jalaj sharma statement marathi news )

पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. महेश परदेशी आणि डॉ. महेश बूब यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तक्रारदाराच्या आईच्या हाताला दुखापत झाली होती. शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. (latest marathi news)

हे उपचार मोफत झाल्याच्या मोबदल्यात डॉ. परदेशी यांनी सात हजार रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) माहिती दिली. ही रक्कम स्वीकारताना परदेशी यांना पकडण्यात आले. लाच मागण्यास प्रोत्साहन दिले म्हणून हॉस्पिटलचे दुसरे संचालक डॉ. बूब यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, शासकीय योजनेंतर्गत मोफत उपचार करणाऱ्या एखाद्या खासगी रुग्णालयावर अशा प्रकारे कारवाई होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. योजनेंतर्गत उपचारांचे पैसे शासनाकडून संबंधित रुग्णालयास दिले जातात. तरीही रुग्णालये रुग्णांकडे अतिरिक्त पैशांची मागणी करीत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

Ajit Pawar: विलासराव देशमुख हे उत्तम मुख्यमंत्री! आता CM पदाच्या शर्यतीत आहात का? अजित पवारांनी स्पष्ट केले मत

Chole Pattice Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार छोले पॅटिस, वीकेंडचा आनंद होईल द्विगुणित

तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड म्हमद्याचा गोळीबार आर्थिक वादातून; दोन तासांत आवळल्या चौघांच्या मुसक्या

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

SCROLL FOR NEXT