Collector Jalaj Sharma, actor Arun Kadam, Deputy Commissioner Ramesh Kale, Deputy Commissioner Rani Tate, District Parishad Chief Executive Officer Aashima Mittal, Tehsildar Shobha Pujari etc. esakal
नाशिक

Maha Sanskruti Mahotsav : नाशिक महासंस्कृती महोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Maha Sanskruti Mahotsav : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Maha Sanskruti Mahotsav : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असून, त्याचा सर्वांनी आनंद घेण्याचे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासनातर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात पाच दिवसीय ‘महासंस्कृती महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी बुधवारी (ता. २८) ते बोलत होते. (nashik Collector Jalaj Sharma statement of Mahasanskruti Mahotsav marathi news)

या वेळी विभागीय उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त राणी ताटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, हास्यजत्रा फेम अरुण कदम, तहसीलदार मंजूषा घाटगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सोमठाणा (ता. येवला) येथील हभप निवृत्ती महाराज चव्हाण यांचे कीर्तन झाले.

व्यसन आणि फॅशनच्या मागे धावणाऱ्या आजच्या पिढीला संस्कृती शिकवण्याची खरी गरज आहे. वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून हे सत्कार्य करत आहे. आपल्या आई-वडीलांमध्ये देव आहे. त्यांचे पूजन करण्याचा मौलिक सल्ला महाराजांनी कीर्तनातून दिला. बागेश्री वाद्यवृंदाने ‘हे नटराज’ ही नांदी सादर केली. प्रसिद्ध सिनेकलावंत अरुण कदम यांनी ‘लेकी जिजाऊंच्या’ या कार्यक्रमातून मनोरंजनात्मक पद्धतीने त्यांनी महिलांना स्व:रक्षणाचे धडे दिले. कल्पेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. (latest marathi news)

शिवकालीन साहित्याचे प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याने लढाई काळात वापरलेल्या तलवारी, ढाल, खंजीर, चाबूक यांसारख्या मौल्यवान वस्तुंचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले आहे. तसेच शिवकालीन गडकोट, छायाचित्र, नाणी, पगडी, ऐतिहासिक कागदपत्रे, टपाल तिकिटाचे प्रदर्शन या ठिकाणी रसिकांना बघायला मिळणार आहे.

आजचे कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सवात गुरुवारी (ता.२९) सायंकाळी ४ वाजता श्यामची आई हे नाटक सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कलगीतुरा हे नाटक व त्यानंतर शुअर शॉट इव्हेंटसचा ‘नवदुर्गा सांस्कृतिक कार्यक्रम’ सादर होणार आहे. नाशिककरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT