Collector Jalaj Sharma giving a dose of polio to a child at a general hospital. esakal
नाशिक

Nashik Polio Vaccination : एकही मुल पोलिओ लसीकरणापासून वंचित नको : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Polio Vaccination : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Polio Vaccination : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. यापुढेही रुग्ण मिळायला नको, यासाठी एकही मुल पोलिओ लसीकरण मोहिमेपासून वंचित राहता कामा नये अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी (ता. ३) पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. (Nashik Collector Jalaj Sharma statement of polio vaccination marathi news)

यावेळी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे, उपसंचालक डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकरी डॉ. हर्षल नेहेते, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. प्रकाश नंदापुरकर डॉ. दीपक लोणे, डॉ. रोहन बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी एका बालकास दोन थेंब देवून लसीकरणाचा शुभारंभ केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. सुधाकर मोरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बागूल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने प्रत्येक गावात, बस स्थानक, रेल्वे स्टेशन याठिकाणी पोलिओ लसीकरण केले.

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शून्य ते पाच वयोगटातील बालकांना विविध ठिकाणी लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात चार लाख २५ हजार ९४५ बालकांना डोस देण्यात येणार आहे. त्यापैकी साधारणत: ३ लाख ६३ हजार बालकांनी (८९.११ टक्के) पोलिओ डोस घेतला नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील ५५ हजार ८८४ बालकांपैकी ४९ हजार (७२.१२ टक्के) बालकांनी डोस घेतला. लस देण्यात येणार आहे. (latest marathi news)

मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक लाख १३ हजार ९२० बालकांपैकी ५६ हजार ८३८ बालकांनी (५० टक्के) रविवारी पोलिओ डोस घेतल्याची माहिती प्रजनन व बालसंगोपन अधिकारी डॉ. अलका भावसार यांनी दिली.

आजपासून घरोघरी लसीकरण

शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सोमवारपासून पाच दिवस घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. मंगळवार (ता. ५) पासून तीन दिवस ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मुलांना आयपीपीआय करण्यात येणार आहे.

बोलके आकडे

विभाग लक्षांक उदिष्टपूर्ती

जिल्हा आरोग्य विभाग ४ लाख २५ हजार ९४३ ३ लाख ६३ हजार

नगरपालिका व नगरपंचायती ५५ हजार ८८४ ४९ हजार

मालेगाव महापालिका एक लाख १३ हजार ९२० ५६ हजार ८३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT