Colorful flower farm in Chandwad taluka esakal
नाशिक

Nashik News : नवरात्रोत्सवात चांदवड तालुक्यात फुलली रंगबिरंगी फुलशेती!

Latest Nashik News : चांदवड तालुक्यातील आधुनिक पद्धतीने झेंडूची लागवड करून चार महिन्यात शेतकऱ्याच्या हातात चांगले पैसे देणारे झेंडू पीक शेतकऱ्यांच्या पसंतीचे बनले आहे.

सकाळ वृत्तसेवा

काजीसांगवी : अवर्षणग्रस्त असूनही कांदा पिकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील आधुनिक पद्धतीने झेंडूची लागवड करून चार महिन्यात शेतकऱ्याच्या हातात चांगले पैसे देणारे झेंडू पीक शेतकऱ्यांच्या पसंतीचे बनले आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात शेतकऱ्यांनी रंगबेरंगी फुलशेती फुलवली आहे. (colorful flower farm bloomed in Chandwad taluka)

कांदा व टोमॅटोच्या पाठोपाठ लखपती करणारे झेंडू फुलाचे पीक असून एरवीही शेतीच्या बांधाच्या कडेला कांदा क्षेत्राच्या एखाद्या कोपऱ्यात पाच ते दहा झाडाची लागवड करून पूजा विधीसाठी लागणारी फुलाची गरज भागविणारे शेतकरी कांदा उत्पादनाबरोबर आता झेंडू शेतीकडे वळले आहेत. कांदा व टोमॅटो नंतर अवघ्या चार महिन्यात हे पीक हाताशी येते.

गावोगावी पसंती

तालुक्यातील रायपूर तळवाडे, गणूर, आसरखेडे, देणेवाडी, भरविहीर, शिरसाणे ,सोग्रस, हिवरखेडे, निमगव्हाण, काजीसांगवी, मंगरुळ, सोनीसांगवी, खेलदरी, पन्हाळे, तीसगाव, बेपाने ,दिघवद परिसरात यावर्षी अंबर, प्राईम ऎलो, इंडस, अँरोगाँड, आदी जातीच्या झेंडूची फूल शेतीची लागवड झाली आहे.

शेतकऱ्यांनी पाच गुंठयापासून एक ते दोन एकरापर्यत क्षेत्र हे झेंडू फूल शेतीसाठी निवडले आहे. काही शेतकऱ्यांनी दुहेरी पीक म्हणून झेंडु फुल शेतीसाठी निवडले आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीला हे पीक बाजारात विक्रीसाठी येईल. अशा पद्धतीने जुलैच्या महिन्यात या पीकाची लागवड करून उत्पादन घेतले आहे. गणेशोत्सवातही झेंडूने चांगले दिवस दाखविले. (latest marathi news)

आंतरपीक म्हणून पसंती

प्राईम ऎलो, इंडस, जातीला मागणी आहे. गणेशोत्सवात ३० ते १२० रुपये किलोपर्यंत विक्री झाली. आवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पण दिवाळीसाठी शेतकऱ्यांनी पीक मोठ्या कष्टाने उभे केले आहे. त्यातील काहींनी डाळिंब पिकात अंतर पीक म्हणून फूल शेती बनविली आहे. फूल तोडणीनंतर सेंद्रीय खत म्हणून उपयोग करतात.

डाळिंबावरील मर रोगाचा प्रार्दुभाव दिसला नाही. म्हणूनही अनेकांनी डाळिंबात आंतरपीक म्हणून फुलशेतीला पसंती दिली. आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड तुलनेत कमी खर्चाची पडते. झेंडू फुले नाशिक, दादर, सूरत, धुळे, अहमदाबाद, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कल्याण आदी तालुक्यात मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT