नाशिक : धावपळीच्या युगात मानवी जीवनात ज्योतिषशास्त्र मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे हे शास्त्र समाजातील सर्वच वर्गासाठी दिशादर्शक ठरले आहे. मानवाच्या जीवनात ज्योतिषशास्त्र सिद्धांत संहिता व तर्कशास्त्र पूर्ण अभ्यास व अध्यात्म यांची सांगड घालून केलेले असल्याने बहुसंख्य समाजानेही त्याचा स्वीकार केलेला आहे. सहा शास्त्रांपैकी ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून जीवन आनंदी व सुखशांतीपूर्वक जगता येईल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा विश्वास आहे. (Nashik combination of spirituality science from astrology news)
ज्योतिषशास्त्रावर सर्वांचाच शंभर टक्के विश्वास नाही, हे वास्तव असलेतरी विवाह तिथी, मुलामुलींची गुणांची जुळवणूक, नवीन वास्तूची खरेदी, व्यवसायाची मुहूर्तमेढ ते अगदी शिक्षणापर्यंत ज्योतिषशास्त्राचाच मोठ्या प्रमाणावर आधार घेतला जातोय हे वास्तव आहे.
नाशिकची यंत्रनगरी होण्यापूर्वी मंत्रभूमी म्हणून प्राचीन काळापासून ओळख आहे. ही ओळख अद्यापही अबाधित आहे. शहरात माणसाचे भवितव्य वर्तविणारे दोनशेहून अधिक ज्योतिषी कार्यरत आहेत. अलीकडे या शास्त्रात थोतांडाचा वाढता वावर वाढल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
ज्योतिषशास्त्राचे प्रमुख प्रकार -
अलीकडच्या काळात अनेकांच्या जीवनात समस्या असून संबंधितांचे समाधान व निरसन करण्यासाठी त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. या शास्त्रात पारंपारिक ज्योतिष, कृष्णमूर्ती ज्योतिष, अंकशास्त्र ज्योतिष, हस्तसामुद्रिक, भगूज्योतिष, नाडी ज्योतिष यासह अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. (latest marathi news)
शास्त्राविषयी थोडेसे....
*कोणत्याही गोष्टीचा सुक्ष्म अभ्यास हवा. त्यामुळे पटकन निदान, निर्णय चुकीचे.
*आपले ज्योतिषशास्त्र ९९ टक्के बरोबर असल्याचा तज्ज्ञांचा दावा.
*ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र, नाडीशास्त्राला मोठे महत्त्व.
*अनुभव, अभ्यासाबरोबरच मनाची एकाग्रताही खूप महत्त्वाची.
*ज्योतिषशास्त्र वेदांचे प्रमुख अंग आहे.
"ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा नसून यात श्रद्धेला मोठे स्थान आहे. या शास्त्रात संहिता सिद्धांत व तर्कशाशास्त्राला आगळे महत्त्व आहे. दुर्दैवाने अलीकडे यात थोतांड जास्त आल्याने ते वर्तविणाऱ्यांचे आचरणही तितकेच महत्त्वाचे आहे."
- ज्योतिर्विद्या वाचस्पती पुरुषोत्तम जोशी गुरुजी, नाशिक
"आज ताणतणावांमुळे मानसिक आजार वाढले आहेत. त्यातूनच शारीरिक व्याधी निर्माण होतात. त्यासाठी प्रथम सक्षम व सकारात्मक बना. हे शास्त्र मार्गदर्शक असल्याने घटना घडण्याअगोदरच तज्ज्ञ ज्योतिषांकडून मार्गदर्शन घ्या. त्यासाठी प्रथम सक्षम बना."
- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिषविद्या वाचस्पती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.