Police Transfer esakal
नाशिक

Nashik Police Transfer: आयुक्तालयातील ‘स्थानिकां’ची थेट जिल्ह्याबाहेर बदली! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल

Nashik News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले असताना, स्थानिक पातळीवर अनेकांनी सेटिंग लावत अकार्यकारी पदावर नेमणूका करून घेतल्या.

मात्र, यासंदर्भात आक्षेप आल्याने थेट पोलीस महासंचालक कार्यालयानेच स्थानिक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या (Nashik Police Transfer) केल्या आहेत. याचा फटका शहर पोलीस आयुक्तालयातील अकार्यकारी पदावर नेमणुका झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बसला आहे. (Nashik Commissionerate police transferred directly outside district Changes wake of Lok Sabha elections marathi news)

पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १० निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, १९ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेचे नितीन पगार, बाबासाहेब दुकळे, गणेश न्याहदे, विशेष पथकाचे पंकज भालेराव, गुन्हे शाखा एकचे निरीक्षक अनिल शिंदे, अभियोग कक्षाचे राजू पाचोरकर, गुन्हे दोनचे विजय पगारे यांची ठाणे शहरात तर श्रीकांत निंबाळकर यांची पुणे शहर, तुषार अढावू, पवन चौधरींची छत्रपती संभाजीनगरात बदली झाली तर, पिंपरी चिंचवडचे समाधान चव्हाण, श्रीनिवास देशमुख, बडेसाब नाईकवाडे, पुण्यातील जयराम पायगुंडे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, छत्रपती संभाजीनगरातील आम्रपाली तायडे, गणेश ताठे, अशोक गिरी, सुशिल जुमडे हे नाशिक आयुक्तालया तर, पिंपरी चिंचवडचे संजय तुंगार यांची ‘एमपीए’त बदली झाली आहे. (Latest Marathi News)

यांच्याही बदल्या

शहरातील सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपूतांची छत्रपती संभाजीनगर, विनायक अहिरेंची पुणे शहर, साजिद मन्सुरी व किशोर खांडवींची मुंबई शहर, छाया देवरे व सुवर्णा हांडोरेंची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, अनिल जगताप, वसंत खतेले, विष्णू भोये, प्रकाश गिते, प्रमिला कावळे, संजय बिडगरांची ठाणे शहरात बदली तर, पिंपरी चिंचवडच्या स्वप्नाली पलांडे, पुणेतील निखील पवार, बापू रायकरांची नाशिक शहरात नियुक्ती.

उपनिरीक्षकांच्या बदल्या

शहरातील पोलिस उपनिरीक्षक रामदास भरसट, ज्ञानेश्वर शेळके, हसन सैय्यद, विलास मुंढे, उत्तम सोनवणे, प्रियंका बागुल, अनिल पाडेकरांची पुणे शहरात, भूषण देवरे, धनश्री पाटील, अपेक्षा जाधव, संजय भिसेंची ठाणे शहरात, सूर्यकांत सोनवणे कोकण परिक्षेत्रात, बाळू वाघ, वैशाली मुकणे व नारायण गोसावींची नाशिक परिक्षेत्रात, अश्विनी उबाळे, नाईद शेख, प्रकाश कातकाडेंची पिंपरी चिंचवडला, लियाक खान पठाण यांची छत्रपती संभाजीनगरात बदली तर, छत्रपती संभाजीनगरातील इनकसिंग घुणावत, शेख निसार शरीफ, कैलास जाधव, संदीप शेवाळे, शेषराव चव्हाण, युवराज शिरसाठ, मुक्तेश्वर लाड, मयूर निकम, गजानन इंगळे, उद्धव हाके, सुनिल चव्हाण, प्रभाकर सोनवणे, रोहित गांगुर्डे यासह पुणेतील माया गावडे, अजित शिंदे यांची नाशिक आयुक्तालयात हजर होतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT