Traffic jam on New Bridge to Moss Pool Circle. esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : सण उत्सवात वाहातूकीचा बोजवारा! मालेगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याची

Latest Nashik News : मोसम पूल भागात सर्कल व संगमेश्वर भागाकडे तसेच मोतीबाग नाक्याकडे जाणारे वाहने, बसमुळे वाहनचालकांचा प्रचंड गोंधळ होऊन येथे कोंडी निर्माण झाली होती. तब्बल एक तास कोंडीने सगळेच हैराण झाले.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरात वाहतूक व्यवस्थेचा मोसम पूल भागात बोजवारा उडाला. मोसम पूल मुख्य भागापासून तर नवीन पुलावर तब्बल एक तासभर वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या. पुलावरील सर्कलजवळ काही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मोसम पूल भागात सर्कल व संगमेश्वर भागाकडे तसेच मोतीबाग नाक्याकडे जाणारे वाहने, बसमुळे वाहनचालकांचा प्रचंड गोंधळ होऊन येथे कोंडी निर्माण झाली होती. तब्बल एक तास कोंडीने सगळेच हैराण झाले. (Traffic jams common in Malegaon area)

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा,पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने खड्डे रस्त्यावरील धूळ, मुख्य रस्त्यावर अतिक्रमण,पार्किंग व्यवस्था, हातगाडे, रिक्षा स्टॉप, वाहनचालकांची मनमानी, अवजड वाहने, सिने स्टाईल बाईक, कार, बेशिस्त चालकांमुळे कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या. दसरा,दिवाळी काही दिवसात सुरू होणार असून वाहतुकीचे नियोजन केले पाहिजे.

पोलिसांचे दुर्लक्ष

मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर मोसम पूल,रामसेतू , सटाणा नाका,एकात्मता चौक,कॉलेज स्टॉप,रावळगाव नाका,शिवतीर्थ,नवीन बस स्टँड पूल जवळील रिक्षा,यामुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नियमित वर्दळ पहावयास मिळते. या कोंडीमुळे शहरातील वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे.

सटाणा नाका,एकात्मता चौक येथे दुकानासमोर वाहने उभी करतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वाहनचालकांवर नियंत्रण ठेवत वाहतूक कोंडी,व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मालेगाव शहरातील नागरिकांना पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)

रस्त्यावर दुकान

नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी मात्र नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. यावर ठोस उपाययोजना करत वर्दळ कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मालेगाव शहरासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

दुचाकी,चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.याचाच फायदा घेत दुचाकी,चारचाकी वाहन चालक बेशिस्त वर्तन,नियम मोडून कोंडी करतात. बँक,शाळा,कॉलेज,भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते, रस्त्यावरील हातगाडे,तात्पुरती दुकाने रस्त्यावर थाटली आहेत.

"मालेगावातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त नाही. वाहतूक व्यवस्था राम भरोसे सुरु आहे. प्रशासन कमकुवत आहे. वाहतूक यंत्रणा हतबल झाली आहे. मोसम पूल, गुळबाजार, नवीन बस स्टँड भागात कायमस्वरूपी कोंडी असते.अतिक्रमणांकडे कोणाचे लक्ष नाही."

- सतीश कलंत्री, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT