A stone ghat in the Godavari river bed at Chandwad. In the second photograph, the Dharamshala built at Karanji. esakal
नाशिक

Nashik News : होळकरकालीन वास्तूंचे व्हावे संवर्धन; किल्ले, मंदिर, बारव, घाट वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना

Nashik News : अहिल्यादेवी होळकर यांचे दातृत्व सर्वपरिचित आहे. त्यांच्या दातृत्वाच्या भावनेतून अनेक सामाजिक कामे उभी राहिली आहेत.

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : अहिल्यादेवी होळकर यांचे दातृत्व सर्वपरिचित आहे. त्यांच्या दातृत्वाच्या भावनेतून अनेक सामाजिक कामे उभी राहिली आहेत. त्याला नाशिक शहरासह जिल्हा अपवाद नाही. आज (ता. ३१) अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती. त्यानिमित्त संवर्धनाचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, हीच अपेक्षा जनमाणसातून व्यक्त होत आहे. (Conservation of Holkar period architecture)

कुशल प्रशासक, उचित न्यायदान आणि सामाजिक कार्यासाठी पुण्यश्‍लाोक अहिल्यादेवी होळकर सर्वपरिचित आहेत. परकीय आक्रमणात उद्धवस्त झालेल्या शेकडो तीर्थक्षेत्रांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. देशभरात उत्तम स्थापत्यशैलीत मंदिरे, घाट, तलाव, अन्नछत्र, बारव आणि धर्मशाळांची अहिल्यादेवींनी उभारणी केली.

अडिचशे वर्षांनंतरही या वास्तू अहिल्यादेवींच्या धीरोदात्त नेतृत्वाची साक्ष देतात. मराठा साम्राज्य विस्तारात सुभेदार मल्हारराव होळकर यांचे बहुमोल योगदान आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे सरदार असलेले मल्हारराव माळवा प्रांताचे सुभेदार होत. सूनबाई अहिल्यादेवी यांनी मल्हारराव यांच्या पश्‍चात जबाबदारीने राज्यकारभार सांभाळला. इंदूरऐवजी नर्मदा तिरावरील महेश्‍वरला राजधानी उभारली.

शिवाय इंदूर गावाचा विकास करण्यासाठी विशेष योगदान दिले. तुंगांपासून माळवा राज्याचे रक्षण करण्यासाठी अहिल्यादेवी यांनी स्वतः लढाईचे नेतृत्व केले. जवळपास ३० वर्षे राज्यकारभार सांभाळताना अहिल्यादेवी यांनी प्रजेला न्यायपूर्ण वागणूक दिली. दररोज जनता दरबार भरवून उचित न्याय देण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. ‘तत्वज्ञानी राणी’ अशी त्यांची अल्पावधीत ओळख निर्माण झाली. (latest marathi news)

विदेशी राज्यकर्त्यांनाही अहिल्यादेवी यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली. परकीय आक्रमणात मंदिरांचा झालेला विध्वंस त्यांना अस्वस्थ करून गेला. देशभरातील मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले. धर्मशाळा, घाट, तलाव, विहिरी, बारव, धर्मशाळा, भोजनशाळा यांची उभारणी केली. रया गेलेल्या तीर्थक्षेत्रांना उजाळा दिला. काश्मीर ते कन्याकुमारी असे त्यांचे कार्य होते.

काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्‍वर, पुरी जगन्नाथ यांच्यासह बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचा अहिल्यादेवी यांनी जीर्णोद्धार केला. मंदिरात नियमित पूजापाठ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. हिंदू धर्माच्या उद्धारात त्यांचे विशेष योगदान आहे. परकीय आक्रमणांची भीती असतानाही अहिल्यादेवी यांनी कार्य नेटाने पूर्ण केले. अहिल्यादेवी यांना ‘पुण्यश्‍लोक’ ही उपाधी उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आली. घडीव दगडातील बांधकाम अजूनही अहिल्यादेवींच्या विशेष कामाची साक्ष देतात.

वास्तुंकडे दुर्लक्ष

अहिल्यादेवी होळकर यांचे इंदूर हे संस्थान असले तरी नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे त्यांच्या उपराजधानीचे शहर म्हणून ओळखले जात होते. नाशिक शहरासह जिल्ह्यावर असलेल्या विशेष प्रेमातून अनेक मंदिरे, गोदाघाट, बारव, किल्ल्यांची निर्मिती त्यांच्या पुढाकाराने झाली. वास्तुशास्राचा उत्तम नमुना असलेले अनेक वास्तू आज दिमाखात उभ्या असल्यातरी त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हेळसांड होत आहे.

उभारलेल्या वास्तू

- गोदावरी परिसर, चांदोरी, करंजगाव, करंजी येथील गोदावरी नदीवरील घाट.

- सोनगाव, भेंडाळी, म्हाळसाकोरे, नैताळे, गिरणारे, चितेगाव येथील बारव

- चांदवड येथील रंगमहाल

- नाशिक येथील होळकर वाडा

- निफाड व लासलगाव येथील भुईकोट किल्ला

"नाशिक जिल्हा व होळकर राजघराण्याचे जुने नाते आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात होळकर यांचे मोठे योगदान आहे. वाडे, घाट, बारव, धर्मशाळा, मंदिरांच्या रूपातील ठेवा आज दुर्लक्षित आहे. जो आपण आपल्या पुढील पिढीसाठी जपला पाहिजे." - श्रीमंत भूषणसिंह होळकर, वंशज, होळकर घराणे, इंदूर

"अहिल्यादेवी होळकर यांनी चितेगाव येथे बांधलेली बारव उत्कृष्ट नमुना असली तरी कालपरत्वे एकबाजूने पडझड झाली आहे. पुरातत्व खात्याने दखल घेऊन दर्जेदार दुरुस्ती करावी." - अभिजित कदम, युवक, चितेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT