Action taken by the municipal encroachment department on the contact office of former MLA Vasant Gite. esakal
नाशिक

Nashik News : माजी आमदारांच्या संपर्क कार्यालयावर हातोडा! महापालिकेकडून कारवाई

Nashik News : माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत जमीनदोस्त करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिवारी (ता. २९) जमीनदोस्त करण्यात आले. केवळ राजकीय आकसपोटी ही एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मोहीम राबवण्यात आल्याचा आरोप श्री. गीते तसेच त्यांच्या समर्थकांनी केला. (contact office of former MLA Vasant Gite was demolished by municipal)

सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मोहीम राबवत न्यायालयाचा अवमान केल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेकडून मोहिमेबाबत कमालीची गोपनीयता बाळगत नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगून गोल्फ क्लब येथे बोलविण्यात आले.

त्यानंतर गायकवाड सभागृह आणि तिथून थेट माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयाजवळ कर्मचाऱ्यांना साहित्य व मशिनरीसह नेण्यात आले. याठिकाणी आल्यावर सर्वांना कारवाईबाबत सांगण्यात आले. यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, संदीप मिटके यांच्यासह पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड.

भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष नरुटे इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी शहर गुन्हे शाखाचे पथक, शीघ्र कृती दल यांच्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला. दुपारी चारला पथकाने कारवाईला सुरवात केली. तत्पूर्वी कारवाईची माहिती कळताच माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई होऊ शकत नाही. (latest marathi news)

असे सांगत कारवाईस मज्जाव केला तसेच आयुक्तांच्या लेखी आदेशाची मागणी केली. त्यानंतर उपायुक्त मयूर पाटील, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्याशी चर्चा केली. दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सायंकाळी सहाला कारवाईबाबत महापालिका आयुक्तांचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरवात करण्यात आली. प्रथम संपर्क कार्यालय शेजारील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर श्री. गीते यांचे संपर्क कार्यालय जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.

कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

५० खोके एकदम ओके, बडी भाभी मुर्दाबाद, सत्ताधारी आमदार मुर्दाबाद, सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या घोषणाबाजी वसंत गीते समर्थक यांच्याकडून करण्यात आली. यामुळे परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते. एस्‍टी महामंडळाची जागा असताना महापालिकेकडून कुठल्या आधारावर कारवाई केली जात आहे. न्यायालयात तीन जुलैची तारीख देण्यात आली आहे. असे असताना न्यायालयाचा अवमान करत कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी माजी आमदार समर्थक यांनी केला.

महापुरुषांचे प्रतिमापूजन

संपर्क कार्यालय तोडण्यापूर्वी प्रथम गीते आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही पुतळे कार्यालयातून सुरक्षितरित्या बाहेर काढून घेण्यात आले.

"न्यायप्रविष्ठ बाब असताना महापालिकेकडून अशाप्रकारे बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. बडी भाभी यांच्या सांगण्यावरून कारवाई झाली आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे."- वसंत गीते, माजी आमदार

"राजकीय आकसकोटी कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी स्वतः राजकीय दबाव असल्याचे सांगितले. तीनला ऑर्डर आणि सहा वाजता सही होते. तसेच सात जून नंतर पावसाळ्यात कारवाई होत नाही. असे असतानाही कारवाई कशी झाली." - सुधाकर बडगुजर, जिल्हाध्यक्ष शिवसेना (उबाठा पक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT