corona update  esakal
नाशिक

Nashik Corona Update : कोरोनाच्या चिंतेने आरोग्य यंत्रणा सतर्क! मूलभूत सोयीसुविधांबाबत दक्षता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Corona Update : देशभरात आणि राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्र स्तरावरून वाढती रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठीच्या कोरोना पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

दुसरीकडे पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता तशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी जिल्हा रूग्णालयांसह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. (Nashik Corona Update health system on alert due to concern of Corona Vigilance regarding basic amenities nashik news)

कोरोनाच्या नवीन विषाणूचा वेगाने फैलाव होत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. परंतु या विषाणूंमुळे बाधितांसह नागरिकांनी कोरोना पंचसूत्रीचा वापर केल्यास त्याचा प्रादूर्भाव रोखता येणारा आहे.

त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, हस्तांदोलन टाळावा, वारंवार हात धुवावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. सतर्क बाळगण्यासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी (ता.१०) कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मॉकड्रिलच्या माध्यमातून पाहणी केली. जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन बेड, आयसोलेशनची व्यवस्था उभारण्यात आली आहे.

त्याप्रमाणे, व्हेटिंलेशन, ऑक्सिजन पाइपलाइन पूर्ववत सुरू केल्या जात आहेत. जिल्ह्यातील १६ वैद्यकीय अधीक्षकांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

हे पथक रुग्णालयांमधील ऑक्सिजन, आयसोलेशन, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर चाचणी, एक्सरे मशिन, औषधे, ऑक्सिजनचा पुरवठा, त्यासाठीच्या परवानगी यांची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल जिल्हा रुग्णालयास सादर करणार आहेत.

ऑक्सिजनची क्षमता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये यासाठी रुग्णालयांमध्येच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किती मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णालयांमध्ये साठवून ठेवण्याची क्षमता आहे याची माहिती घेतली जात आहे. ऑक्सिजनचे जंबो सिलिंडरची उपलब्धता याचीही माहिती संकलित केली जात आहे.

"कोरोनाच्या नवीन विषाणूंमुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी तातडीने उपचाराच्या सुविधा उपलब्ध असल्याने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा."- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT