Bus damaged due to fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident : वणी बस स्थानकात पेटली महामंडळाची बस!

Nashik News : वणी बस स्थानकात आज सकाळी 9 वा. नाशिकहून कळवण जाणारी पिंपळगाव डेपोची जादा बसने अचानक पेट घेतला.

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वणी बस स्थानकात आज सकाळी 9 वा. नाशिकहून कळवण जाणारी पिंपळगाव डेपोची जादा बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगवधान दाखवत गाडीचा स्विच बंद करुन प्रवाशांना घाईने खाली उतरवत २७ प्रवाशांच्या जीव वाचवला.

पिंपळगाव डेपोची बस क्रमांक एम एच १४ बीटी ३७६१ हि नाशिकहून कळवण जाण्यासाठी निघाली असता वणी बस स्थानकात पोहचली होती. बसमध्ये एकुन २७ प्रवासी प्रवास करत होते. वणी बसस्थानकातील फलाटावर बस प्रवाशांसाठी थाबली असतांना लगेचच बसच्या बोनट मधुन मोठ्या प्रमाणात धुर येवु लागला. त्यावेळी बस चालक बी. एल. गवळी हे ड्रायव्हींग सीटवरच बसलेले होते.

त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीला विद्युत पुरवठा करणारा स्वीच बंद केला. त्याचवेळी वाहक ज्योती नाडे यांनी प्रसंग लक्षात घेत प्रवाशांना खाली उतरण्यास सांगुन गाडी पटकन खाली केल्याने जीवीत हानी टळली. प्रवासी उतरत असतांनाच बसच्या बोनट ने पेट घेतला. त्याक्षणी चालक गवळी यांनी बसमधील अग्नी शामन यंत्र हातात घेतले व त्याची पीन काढुन ते चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु अकार्यक्षम असल्याने चालुच झाले नाही.

नी त्याच वेळी गाडीचा गिअर सटकुन गाडी न्युट्रल होत मागे जाऊ लागली. त्यावेळी गाडी पुर्ण रिकामी होती व गाडीमागे कुठलीही गाडी व प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यावेळी नंतर उपस्थित तुषार शर्मा, वर्तमान पत्र विक्रेते सुनिल महाले. (latest marathi news)

वणी बस स्थानकातील वाहतुक नियंत्रक के. के. चौरे व चालक गवळी यांसह उपस्थित प्रवासी व स्थानिक नागरींकानी प्रसंगावधाव राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकुन गाडी थांबवली व वाळु  पाणी टाकुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गाडीची पुढची केबिन पुर्ण जळुन खाक झाली. परंतु उपस्थितांनी पाणी व वाळुचा मारा केल्याने आग आटोक्यात येवुन मागिल भाग जळन्यापासुन वाचवता आल्याने एसटीचे होणारे नुकसान वाचले.

बसवर असलेल्या स्टिकरवरुन सदरची बस दोन दिवसांपुर्वी मतदानाच्या पेट्या व मशिन्स वाहतुक करण्यासाठी वापरली गेल्याचे स्पष्ट होते. त्यादिवशी जर ही बस पेटली असती तर काय झाले असते? असा सवाल उपस्थित होतो. यामागे  संबधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निष्काळजी स्पष्ट होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT