hydraulic ladder esakal
नाशिक

Nashik News : हायड्रोलिक शिडीसाठी मोजावे लागणार ‘युरो’; 38 कोटी रुपयांचा खर्च

Nashik : अग्निशमन व्यवस्था पोचण्यासाठी तेवढ्या उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्यासाठी फिनलँड देशातील कंपनीचीच नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बांधकाम विषयक नवीन नियमावलीत शहरात ९० मीटर उंच इमारत बांधण्यास परवानगी असल्याने भविष्यात मोठ्या उंचीच्या इमारती तयार होऊन त्यात आग लागण्याची दुर्घटना घडल्यास तेथपर्यंत अग्निशमन व्यवस्था पोचण्यासाठी तेवढ्या उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्यासाठी फिनलँड देशातील कंपनीचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ‘युरो’मध्ये महापालिका शिडीसाठी पैसे मोजणार आहे. जवळपास ३८ कोटीचा खर्च नवीन शिडी खरेदीसाठी केला जाणार असून हा खर्च महापालिकेवर बंधनकारक आहे. (cost of Euro 38 crore rupees will have to be paid for hydraulic ladder)

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने संपूर्ण राज्यासाठी २०१९ मध्ये एकिकृत विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीपीआर) लागू केल्याने शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी दिली जात होती. नाशिकमध्ये वाढते शहरीकरणामुळे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात गगनचुंबी इमारती उभ्या राहण्यास सुरवात झाली. या इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास शेवटच्या मजल्यापर्यंत पोचण्यासाठी हायड्रोलिक शिडीची आवश्यकता लागणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म) खरेदी प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार २०१८ मध्ये ९० मीटर उंचीची शिडी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, ज्या कंपनीला ऑर्डर दिली, तीच कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यामुळे सदर कंपनीकडून ३१ मे २०२३ पर्यंत ही शिडी अग्निशमन विभागाला न मिळाल्याने नगररचना विभागाने ७० मीटर उंचीच्या बांधकामांना बंदी घातली. परंतु सदर निर्णय अंगलट येण्याची शक्यता असल्याने चोवीस तासातच निर्णय फिरविला. (latest marathi news)

अग्निशमन शिडी खरेदीला मंजुरी मिळालेली असल्याने महापालिका नगररचना विभागाकडून ७० मीटर उंचीपेक्षा अधिक अशा १८ मोठ्या गृहप्रकल्पांना बांधकामाची मंजुरी दिली होती. महापालिकेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे व्यावसायिक, ग्राहकांमध्ये संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने निर्णय फिरविला गेला. दरम्यान, दुसरीकडे अग्निशमन विभागाने शिडी खरेदीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात फिनलँड येथील मे. वेसा लिफ्ट ओये कंपनी वगळून त्याऐवजी ब्रान्टो स्कायलिफ्ट कंपनीला काम देण्यात आले आहे. युरोपियन कंपनी असल्याने युरोमध्ये पेमेंट दिले जाणार आहे.

‘आरटीओ’ला विनंती

महापालिकेने फिनलँड येथून खरेदी केलेली ३२ मीटर उंचीपर्यंत पोचू शकणारी अग्निशमन शिडीचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने २८ जुलै २०२३ ला या वाहनाची फिटनेस टेस्ट केली. परंतु पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने फिटनेस सर्टिफिकेट दिले नाही. आपत्कालीन परिस्थितीत उद‌‌्भवल्यास संकटावर मात करण्यासाठी किमान अस्तित्वातील ३२ मीटर उंचीच्या शिडीसाठी जुने वाहन बदलून नवे वाहन खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती आरटीओ विभागाला प्रशासनाकडून केला जाणार आहे.

''९० मीटर उंचीच्या इमारतींसाठी अग्निशमन शिडी खरेदीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, फिनलँड येथीलच कंपनी पात्र ठरली. लवकरच कार्यारंभ आदेश दिले जातील. अस्तित्वातील ३२ मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीचे कालबाह्य झालेले वाहन बदलण्यासाठी आरटीओला विनंती केली जाणार आहे.''- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT