District surgeon Dr. present during the 'CPR' week program. Charudatta Shinde, Founder Dr. Venkat Gite, Assistant Surgeon Dr. Dr. Nilesh Patil, Head of Department of Anesthesiology. Sunita Collection. esakal
नाशिक

Nashik News : भूलशास्त्र विभागातर्फे ‘सीपीआर’ जनजागृती आठवडा

Nashik : ‘सीपीआर वीक’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे साजरा झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भूलशास्त्र विभागातर्फे डॉ. अब्दुल कलाम नॅशनल ‘सीपीआर वीक’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे साजरा झाला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अधिष्ठाता डॉ. व्यंकट गिते, सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, विभागप्रमुख डॉ. सुनीता संकलेचा यांनी उपस्थितांना ‘सीआरपी’बद्दल मार्गदर्शन केले व प्रत्येकाने जीवनसंजीवनी शिकावी व दुसऱ्यांनासुद्धा शिकवावी, असे आवाहन केले. (CPR awareness week by Department of Anesthesiology )

दर मिनिटाला भारतात ११२ लोक हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्युमुखी पडतात. त्यांना आपण योग्य वेळेस जीवनसंजीवनी देऊन वाचवू शकतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ ला शिलाँग येथे लोकांशी संवाद साधत असताना व्यासपीठावर अचानक कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणालाही त्यांना ‘सीपीआर’ देता आली नाही आणि ते मृत्युमुखी पडले. तेव्हापासून हा आठवडा ‘सीपीआर’ जनजागृती आठवडा म्हणून साजरा होतो. (latest marathi news)

भूलशास्त्र तज्ज्ञांमार्फत विविध प्रशिक्षणे घेतली जातात. प्रत्येकाने हे तंत्र अवगत केल्यास भारतातील प्रत्येक नागरिक जीवनरक्षक बनू शकतो. कार्यक्रमाला भूलशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जयश्री साळी, डॉ. काशीनाथ जाधव, डॉ. सावणी फुटाणे, डॉ. सचिन पवार व संस्थेचे सर्व विभागप्रमुख, मेट्रन शुभांगी वाघ, उपप्राचार्य सचिन माळी, आशालता गोंधळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT