Bike Theft esakal
नाशिक

Nashik Bike Theft : मालेगावात दुचाकी, मोबाईल चोरीचे सत्र; चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी

Nashik News : मालेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी व मोबाईल चोरीचे सत्र सुरुच आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी व मोबाईल चोरीचे सत्र सुरुच आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात चार वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी एक लाख १० हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी लंपास केल्या. तर मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून १३ मोबाईल हस्तगत केले. (Bike and mobile theft in Malegaon)

पोलिस प्रशासनाने गस्तीपथके वाढवून दुचाकी व मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे. मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत. घरासमोरुन हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकी रात्री-अपरात्री पळविल्या जात आहेत. बाजारपेठा, शासकीय कार्यालय आदी ठिकाणांहून चोरटे दुचाकी लंपास करतात. यामुळे दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील मर्चंटनगर भागातील शेख अक्रम शेख खाटीक (वय २९) या तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दुचाकी (एमएच ४१ बीजे १९६०) चोरट्यांनी लंपास केली. ५ जुलैला सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान मसगा महाविद्यालयासमोरील रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली.

अक्रम शेख यांच्या तक्रारीवरुन कॅम्प पोलिस ठाण्यात २४ ते २५ वयोगटातील इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन बस स्थानकासमोरील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीजवळून भिमा मांगु सोनवणे (वय २६, रा. भायगाव, मालेगाव) यांची ५० हजाराची एचएफ डिलक्स दुचाकी (एमएच ४१ एके ६८२८) चोरट्यांनी पळवली. (latest marathi news)

२ जुलैला सकाळी आठ ते नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. आयेशानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कॅम्प भागातील सिद्धीविनायक कॉलनीतील किशोर धनराज शिंदे (वय ४२) यांची १५ हजाराची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच ४१ वाय ५६२५) चोरट्यांनी चोरुन नेली. २६ जूनला दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान हॉटेल इलायचीच्या प्रवेशद्वाराजवळून दुचाकी पळविली. छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दोघा भामट्यांना अटक

जुना मुंबई-आग्रा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ दुचाकी चोरीचा चौथा प्रकार घडला. प्रणय सुरेश निकम (वय २९, रा. सोयगाव) यांच्या मालकीची १० हजार रुपये किंमतीची सुझुकी दुचाकी (एमएच ४१ वाय ८१३०) चोरट्यांनी हॅन्डललॉक डुप्लिकेट चावीने उघडून चोरुन नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल अजीज अब्दुल लतीफ (वय ३५, रा. मुस्लीमपुरा).

मोहम्मद नाजीम अब्दुल रहेमान (वय २७, रा. गोल्डननगर) या दोघा भामट्यांना पोलिसांनी अटक केली. ८ जुलैला रात्री पाऊणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अलगद काढला जातो मोबाईल

शहराला जोडणाऱ्या चारही बाजूच्या रस्त्यांवर सायंकाळी व रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्यांचे मोबाईल पळविले जात आहेत. बहुतांशी दुचाकीचालक शर्टच्या खिशात मोबाईल ठेवतात. पाठीमागून दुचाकीवर दोघे भामटे येवून पाठीमागे बसलेला भामटा पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या खिशातून अलगद मोबाईल काढून पोबारा करतात.

अचानक खिशातून मोबाईल गेल्याने बेसावध असलेला दुचाकीस्वार चोरट्यांचा अयशस्वी पाठलाग करतो. यातून अनेकवेळा अपघात होतात. मालेगाव-अजंग, मालेगाव-चंदनपुरी, मालेगाव-दाभाडी, मालेगाव-करंजगव्हाण, मालेगाव-चाळीसगाव फाटा या रस्त्यांवर सातत्याने हे प्रकार घडत आहेत. चोऱ्यांमुळे मोबाईल चालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT