Nashik Crime News : भद्रकाली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना दीड लाखांच्या १५ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली असून सराईत गुन्हेगार गांजा तस्करीत शिरकाव करीत असल्याचे यातून समोर येते आहे. (15 kg ganja found with criminals)
सागर सोमनाथ बलसाने (२६, रा. नाशिक सेंट्रल मार्केट, मातंगवाडा, भद्रकाली), सनी किशोर देवाडिगा (३०, रा. मधली होळी, जुने नाशिक. मूळ रा. मातंगवाडा, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांविरोधात यापूर्वीही मारहाणीसह विनयभंगाचे गुन्हे भद्रकाली पोलिसांत दाखल आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना सराईत गुन्हेगार हे गांजा घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांना खबर दिली.
त्यांच्या सूचनेनुसार, तपोवन लिंक रोडवर पथकाचे सहायक निरीक्षक विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, अंमलदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अनिरूद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अनिवाश फुलपगारे, अर्चना भड यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी गोण्यांमध्ये १ लाख ६० हजार रुपयांचा १५ किलो १६१ ग्रॅम गांजा दडवलेला आढळून आला. (latest marathi news)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी शहरातील अंमलीपदार्थ विरोधात धडक मोहीम राबवून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पथकाकडून आयुक्तालय हद्दीत अंमलीपदार्थांच्या तस्करीवर करडी नजर ठेवली जात आहे.
संशयित सराईत गुन्हेगार
गांजा तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेला सराईत गन्हेगार सागर बलसाने याच्याविरोधात भ्रदकाली पोलीसात गंभीर मारहाणीचा तर, संशयित सनी देवाडिगा याच्याविरोधात भद्रकाली पोलीसात विनयभंगाचा गुन्हा यापूर्वीच दाखल असून, दोघे सराईत गन्हेगार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.