crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : गंगाघाटावरून भरदिवसा 2 दुचाक्या चोरीला! शहरात दुचाक्या चोरट्यांचा पुन्हा सुळसुळाट

Nashik Crime : गोदाघाटावर दुचाक्या पार्किंग केल्यानंतर त्या सुरक्षित राहतील याची कोणतीही शाश्वती देता येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदाघाटावर दुचाक्या पार्किंग केल्यानंतर त्या सुरक्षित राहतील याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. सांडव्याच्या देवी मंदिर व यशवंत महाराज पटांगणावरून पार्क केलेल्या दुचाक्या अवघ्या काही मिनिटात चोरट्यांनी लंपास केल्या तर, उपनगर हद्दीतून मोपेड दुचाकीही भरदिवसा इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. दुचाक्या चोरट्यांना आळा बसवा यासाठी दिवसाही पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी होते आहे. (Nashik Crime 2 bike stolen from Ganga Ghat in day marathi News)

पंकज अशोक आहेर (रा. खेरवाडी, ता निफाड. सध्या रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांची ३० हजारांची होंडा शाईन दुचाक (एमएच १५ जीए ७५४४) शनिवारी ( ता. ३०) सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान गंगाघाटावरील सांडव्याच्या देवी मंदिराजवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

तर, अमिता सतिश काथे (रा. मधली होळी, तिवंधा लेन, जुने नाशिक) यांची ३० हजारांची ॲक्टिवा मोपेड दुचाकी (एमएच १५ एचएक्स ६५९२) शुक्रवारी (ता. २६) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास गंगाघाटावरील यशवंत महाराज मंदिराच्या बाजुच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहबाज सलिम सय्यद (रा. विहितगाव) यांची ५२ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ सीएफ ४६३८) रविवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊ ते दुपारी पावणे चार या दरम्यान गांधीनगर येथील प्राईड ज्युपीटर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT