Expensive cars seized by police from Vaibhav Deore. esakal
नाशिक

Vaibhav Deore Extortion Case : खंडणीखोर देवरेविरोधात आणखी 2 गुन्हे; पोलिस कोठडीत 5 दिवस वाढ

Vaibhav Deore Extortion Case : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या खंडणीखोर वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीमध्ये आणखी पाच दिवसांची वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Vaibhav Deore Extortion Case : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या खंडणीखोर वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीमध्ये आणखी पाच दिवसांची वाढ झाली आहे. आणखी दोन गुन्हेही दाखल करण्यात आले असून, यात भाजपचे पदाधिकारी जगन पाटील यांना तब्बल तीन कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दरम्यान, देवरेकडे असलेली आणखी दोन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. (nashik crime 2 more crimes against extortionist Deore )

गोविंदनगर परिसरातील व्यावसायिक विजय खानकरी यांना १२ लाखांच्या खंडणी प्रकरणी वैभव देवरे (रा. चेतनानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल होताच, देवरे याचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. अल्पावधीत कोट्यवधींची मालमत्ता जमविणाऱ्या वैभव देवरे याच्याविरोधात तक्रारीचा ओघ सुरू झाला आहे. देवरे यास गुरुवारी (ता. ११) अटक केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास शनिवारी (ता. १३) पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली.

या गुन्ह्यावर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत. संशयित देवरे याच्याविरोधात फसवणूक झालेल्यांनी पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुन्ह्याचा तपास इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे करीत आहेत.

जगन पाटील यांना गंडा

संशयित वैभव देवरे याने शहर-जिल्ह्यातील अनेकांना व्याजाने पैसे देत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादराने रकमा वसूल केल्या आहेत. सिडकोतील भाजपचे पदाधिकारी जगन पाटील यांनी संशयित देवरे यांच्याकडून २० लाख रुपये व्याजाने घेतले असता, देवरे याने त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपये उकळले आहेत. दुसऱ्या एका गुन्ह्यात चार लाख रुपये व्याजाने घेतलेल्या व्यक्तीकडून २८ लाख रुपये घेतले आहेत. आणखीही तक्रारी देवरे याच्याविरोधात येत आहेत.

आणखी दोन कार जप्त

खंडणीखोर देवरे याने व्याजाने पैसे दिल्यानंतर संबंधिताने परतफेड केल्यानंतरही तो त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास संबंधितांकडील चारचाकी वाहने बळजबरीने घेऊन यायचा. अशा आणखी दोन चार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यापूर्वी त्याच्याकडे चार कार, एक ट्रॅक्टर, चार दुचाकी असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. याशिवाय त्याचा सटाण्यात सुमारे पाच एकराचा फार्महाउसही आहे.

''संशयित देवरे याच्या बँक खात्याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच, त्याने फसवणूक केलेल्यांनी पोलिसांकडे संपर्क साधून तक्रार करावी.''- अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT