Cutting & Stolen Sandalwood Tree esakal
नाशिक

Nashik Crime : जिल्हा न्यायाधीशांच्या शेतातून 20 वर्षांचे चंदनाचे झाड चोरीला! सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील घटना

Crime News : चोरून नेलेल्या झाडाचा बुंधा व जमिनीखालील खोडाची किंमत बाजार मूल्यानुसार सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक होती.

सकाळ वृत्तसेवा

वावी : संगमनेर येथील जिल्हा न्यायाधीश श्री. दिलीप शिवाजी घुमरे यांच्या सांगवी ता. सिन्नर येथील शेतातून घराजवळच्या विहिरी शेजारी असलेले सुमारे वीस वर्ष वयाचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी चंदनाचे राहिलेले खोड देखील जमिनीत खड्डा खोदून कापून नेले. चोरून नेलेल्या झाडाचा बुंधा व जमिनीखालील खोडाची किंमत बाजार मूल्यानुसार सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक होती. 

सांगवी येथे घुमरे कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती आहे. जिल्हा न्यायाधीश असलेले श्री दिलीप घुमरे हे संगमनेर सगमनेर न्यायालयात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी व कुटुंबीय गावाकडे असणारी शेती सांभाळतात. दिनांक 28 मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराजवळ 200 मीटर अंतरावर असलेल्या विहिरी शेजारी असलेल्या वीस वर्षे वाढलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला.

सुमारे एक फूट व्यासाचा व 25 फूट लांबीचा हा बुंधा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वीज पंप सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेलेल्या सौ. दिपाली घुमरे यांना चंदनाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्या आढळून आल्या. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती देत एमआयडीसी पोलिसांना कळवले.

पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी कापून नेलेल्या बुंध्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपये इतकी होती. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी पुन्हा घुमरे वस्तीवर येत झाडाचा जमिनीत असलेले दोन फूट खोड खोदून काढून नेले. या खोडात परिपक्व झालेला चंदनाचा गाभा असल्याने त्याची किंमत देखील सुमारे तीन लाखांपर्यंत होती.  (latest marathi news)

चंदनाचे झाड चोरीस जाण्यापूर्वी दोन दिवस अगोदर अज्ञात चोरट्यांनी परिसराची पाहणी केली होती. विहिरी शेजारी आपोआप उगवलेले चंदनाचे झाड वीस वर्षे वाढलेले असल्याने परिपक्व झाले होते. या झाडाच्या खोडाला ड्रिल करून चोरट्यांनी गाभ्याची पडताळणी केली होती.

कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ड्रिल केलेल्या ठिकाणी चिखल लावला होता. मात्र झाडाजवळून सुगंध दरवळत असल्याने घुमरे यांच्याकडे कामाला असणाऱ्या मजुरांच्या ही बाब लक्षात आली होती. त्यांनी सौ. घुमरे यांना त्याबाबत सांगून सदर झाड लवकरात लवकर काढून घेण्यास सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच चोरट्यांनी डाव साधला. 

"विहिरी जवळ उगवलेल्या झाडाची योग्य पद्धतीने वाढ व्हावी म्हणून गेली वीस वर्षे निगा राखली. या झाडाच्या लाकडापासून देवघर बनवायचे होते. झाड परिपक्व झाल्यामुळे ते काढण्याचे ठरले होते. मात्र चोरट्यांनी पूर्ण वाढ झालेला 25 फूट उंचीचा बुंधा कापून नेला. त्यात सुमारे तीन फूट गाभा होता. तर उर्वरित खोड देखील दुसऱ्या रात्री खोदून नेले. परिसरात बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बांधावर आपोआप वाढलेली चंदनाची झाडे आहेत. चंदन चोरांची टोळी या भागात सतत फिरत असते. काही आठवड्यांपूर्वी शेजारच्या वस्तीवरून देखील पाच ते सात वर्ष वयाची झाडे तोडून नेली होती. "- सौ. दिपाली घुमरे,  सांगवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT