Jailed esakal
नाशिक

Nashik Crime News : शुभम पगारे हत्या प्रकरणातील एकास 3 दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मनमाड शहरात मागील भांडणाच्या वादातून नगरसेविकेचा मुलगा शुभम देवीदास पगारे याची परवा (ता. ३) रात्री हत्या झाल्याची घटना घडली असताना आज सहा आरोपींपैकी कृष्णा भागीनाथ थोरात (वय २७, रा. आययूडीपी मंगल मूर्तीनगर, मनमाड) यास अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली. (3 days custody to one in Shubham Pagare murder case )

शनिवारी (ता.३) रात्री शुभम देवीदास पगारे याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. शुभम देवीदास पगारे व मामाचा मुलगा, भाचा व भावाचा मित्र भाऊसाहेब नानाजी रसाळ असे अजित जगताप यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून मनमाड शहरातील विवेकानंदनगर, नंबर-२ येथील भोलेनाथ केटरर्सच्या पुढे रस्त्याने येत असताना तेथे रुषांत सुडके, कृष्णा थोरात, मोहित उर्फ ओम पगारे व इतर एक अनोळखी पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा. मनमाड) यांनी हातात चॉपर, लाकडी दांडे घेऊन विकास ऊर्फ पिंटू वाघ व मुकुंद ऊर्फ बंटी वाघ (रा. मनमाड) यांच्या सांगण्यावरून शुभम यास रस्त्यात अडवून मागील भांडणाची कुरापत काढली.

तसेच यांना ‘सोडू नका, मारून टाका’ असा ठार मारण्याचा दम देऊन शुभम यास रुषांत सुडके याने त्याच्या हातातील चॉपरने छातीवर व इतर तिघांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने डोक्यावर, पायावर, पाठीवर, हातावर मारहाण करून गंभीररीत्या जखमी करून ठार मारले होते. सदर हत्येची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका जमावाने घेतल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला होता.

परंतु मृत शुभम पगारे याचा भाऊ शेखर देवीदास पगारे याच्या फिर्यादीवरून रुषांत सुडके, कृष्णा थोरात, मोहित उर्फ ओम पगारे, विकास उर्फ पिंटू वाघ, मुकुंद उर्फ बंटी वाघ व एक अनोळखी अशा सहा जणांवर खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या सहा जणांपैकी रुषांत सुडके हा जखमी असल्याने मालेगाव येथे रुग्णालयात उपचार घेत असून, दुसरा कृष्णा थोरात यास आज अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT