Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : किराणा दुकान फोडून पाऊण लाखांचे सिगारेटवर डल्ला; आयुक्तालय हद्दीत 3 घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आडगाव हद्दीतील किराणा दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे ७३ हजार रुपयांचे सिगारेटचे पाकिटे चोरून नेत घरफोडी केल्याने पंचनामा करण्यासाठी गेलेले पोलिसही चक्रावले. तर, पंचवटी व इंदिरानगरमध्ये बंद फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शहर हद्दीत घरफोड्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत. ( 3 house burglaries in commissionerate area)

पोलिस गस्त असूनही घरफोड्यासारखे गुन्हे घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. पंचवटीतील सेवाकुंज समोर असलेल्या हौसिंग सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ६५ हजारांचे दागिने चोरून नेत घरफोडी केली. प्रल्हाद बाबुराव सोनवणे (रा. जय माताजी हौसिंग सोसायटी, सेवाकुंजसमोर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवार (ता.६) ते शनिवारी (ता.८) या दरम्यान त्यांचा फ्लॅट बंद होता.

या संधीचा फायदा घेत अज्ञात संशयितांनी या दरम्यान, दरवाजाचे कुलूप तोडले आणि बेडरुममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असे २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आडगाव येथील महालक्ष्मी ट्रेडर्स होलसेल किराणा दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेत घरफोडी केली.

प्रशांत कचरू सावळकर (रा. धनगर गल्ली, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स होलसेल किराणा दुकान असून, अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री सदरची घरफोडी केली. यात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे सिगारेटचे पाकिटे, साडेतीन हजारांची रोकड असा ७६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, इंदिरानगर हद्दीतील चेतनानगर येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ९८ हजारांचा मुददेमाल चोरून नेत घरफोडी केली. मोहन सुधाकर सोनवणे (रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, २ ते ७ या तारखेदरम्यान, त्यांचे फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून बेडरुममधून लोखंडी कपाटातून ४८ हजारांचे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड असा ९८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस गस्त नावालाच

शहरात पोलिस ठाणेनिहाय दिवस-रात्र पोलिस गस्त असते. परंतु असे असतानाही गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. यामुळे गस्तीवरील पोलिसांची हद्दीत गस्त असते की फक्त नावाला असते, याबाबत नागरिकांकडूनच संशय व्यक्त होतो आहे. घरफोड्यांच्या घटनांना आळा बसावा यासाठी नियमित गस्त असावी व कामचुकारांवर कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT