Nashik Fraud Crime : मुंबई पोलिस, सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी करत भामट्यांनी निवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मनी लाँड्रींग केसमध्ये कारवाई करण्याचा धाक दाखवत अवघ्या सात दिवसांत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित निवृत्त बँक अधिकाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. (Nashik Crime fraud of retired employee by fake CBI officer marathi news)
दिगंबर शंकर शालीग्राम (६१, रा. डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड) असे फसवणूक झालेल्या निवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना गेल्या ७ मार्चला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत भामट्यांनी धमकावले. आपण मुंबई पोलिस, सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी करताना तुम्ही मनी लॉड्रींग केसमध्ये सहभागी असल्याचे सांगत अटक करण्याची धमकी दिली.
अटक न करण्याच्या मोबदल्यात वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. ७ ते १३ मार्च कालावधीत एकूण ४५ लाख १० हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी जमादेखील केली. परंतु भामट्यांकडून आणखी पैशांची मागणी होत असताना, आपली फसवणूक झाल्याचे शाळिग्राम यांना लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेताना फिर्याद दाखल केली आहे.
भामट्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर..
या गुन्ह्यातील भामट्यांनी चलाखीने तंत्रज्ञानाचा वापर करत आर्थिक फसवणूक केली आहे. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तसेच स्काईप आयडीच्या साहाय्याने संपर्क साधत, चॅटिंग करत भामट्यांनी सरकारी तसेच खासगी बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचे नाव नसून, भामट्यांनी संपर्क केलेल्या मोबाईल क्रमांकांचा व स्काईप आयडीचा संशयितांमध्ये समावेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.