Place where onion stolen esakal
नाशिक

Nashik Crime News: अंबासनला 45 क्विंटल कांदा चोरीला! पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

अंबासन : येथील मालेगाव नामपुर रस्त्यावरील निमदरा फाट्यानजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून पहाटेचे सुमारास तब्बल ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित शेतकऱ्याने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. (Nashik Crime 45 quintal onion stolen from Ambasan news)

मालेगाव नामपुर रस्त्यावरील शेतकरी एम.एस. पाटील यांच्या शेतातील (गट क्रमांक ५२५/१) मध्ये युवा शेतकरी देविदास शामराव कोर याने पाच एकर क्षेत्र तोडबटाईने केली आहे. देविदास याने शेतात कांदा लागवड केली होती. कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांना एक लाख ३५ हजार रुपयांहून अधिक खर्च आल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वीच दोन ट्रॉली कांदा त्यांनी विक्री केला होता. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतात राखून ठेवलेला दोन ते अडीच ट्रॉली कांदा मंगळवार (ता.१४) रोजी कुटुंबियांसह कांदा परतवारी करून विक्रीसाठी ट्रॉलीत भरत होते. सायंकाळी उशीर झाल्याने त्यांनी सकाळी कांदा भरण्याचे ठरवीले होते.

दरम्यान पहाटेच्या सुमारस पावसाचे वातावरण झाल्याने शेतात उभे असलेल्या ट्रॉलीतील कांदा झाकण्यासाठी गेले असता त्यांना ट्रॉलीतील कांदा व शेतात शिरोळी करून ठेवलेला कांदा चोरी गेल्याचे निदर्शनात आले. यामुळे युवा कांदा उत्पादक शेतकरी देविदास कोर याची पायाखालची जमीन सरकली त्यांनी तात्काळ ही माहिती कुटुंबीयांना सांगितली. (latest marathi news)

शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चोरीला गेल्याने कुटुंबियांना गहिवरून आले होते. देविदास याने तातडीने वडनेर खाकुर्डी येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली मात्र रात्री अनेक वाहने जाताना दिसून आले यामुळे थांगपत्ता लागू शकला नाही. जायखेडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कांदा चोरीची तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.

"शेतात शिरोळी करून ठेवलेला कांदा होता दुसऱ्या दिवशी विक्रीसाठी ट्रॅक्टरमध्ये भरत होतो मात्र अंधार झाल्याने दुसऱ्या दिवशी उर्वरित कांदा ट्रॉलीत भरणार होतो. पाटे पावसाचे वातावरण दिसून आलाने जात नसती गेलो असता चोरीचा प्रकार समोर आला. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे."- देविदास कोर, युवा शेतकरी अंबासन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT