सिडको : मागील भांडणाची कुरापत काढून डोक्यात राग धरत टोळक्याने राजा सिंग (वय १६, रा. स्वामीनगर, अंबड) या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करीत हत्या केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे व चुंचाळे पोलिस चौकीतील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सात संशयित आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. या संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime 7 suspects in custody in case of beating death)
शुक्रवारी (ता. २४) सायंकाळच्या सुमारास मृत राजा सिंग याचे संशयितांसोबत अंबड येथील दत्तनगर येथे भांडण, हाणामारी झाली होती.
याच भांडणाचा राग मनात ठेवत निखिल दीपक पगारे (वय १९, रा. मोरे, वरचे चुंचाळे नाशिक), प्रवीण गोवर्धने (वय २१ अंजली पार्क, दत्तनगर, नाशिक), शुभम कडुसकर (२३, रा. दत्तनगर अंबड, नाशिक), अमन खरात (२४, घरकुल चुंचाळे शिवार, अंबड नाशिक), संतोष वाघमारे (वय २३,
दातीरनगर, चुंचाळे शिवार नाशिक), सिद्धार्थ दाभाडे,(२३, घरकुल चुंचाळे संविधान चौक, तसेच अशोक वामनराव साळवे (२२ घरकुल चुंचाळे नाशिक) यांनी शनिवारी (ता. २५) सायंकाळी अंबडगाव येथून राजा याचे अपहरण करून विल्होळी येथील एका खडी क्रशर जवळ उचलून नेले.
त्या ठिकाणी त्या बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र या मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला.
अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, तसेच एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ठिकाणचे गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मारेकरांना अंबड, तसेच घरकुल या भागातून ताब्यात घेतले.
तर यातील तिघा संशयितांना माजलगाव बीड या भागातून ताब्यात घेतले. या सर्व आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, नईम शेख, जनार्दन ढाकणे, पवन परदेशी, किरण सोनवणे, सुरेश जाधव, अर्जुन कांदिलकर, श्रीहरी बिराजदार, अनिल गाढवे, राकेश राऊत, सचिन करंजे, घनश्याम भोये, तुषार मते, कुणाल राठोड, संजय भुरे या टीमने संशयितांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.