Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करीत झटापट! दीपअमावस्येच्या रात्रीची घटना; गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दीपअमावस्येनिमित्ताने शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रविवारी (ता. ५) रात्री शहरात पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी करीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जात होती. त्यावेळी अमृतधाम चौकात आरडाओरडा करणाऱ्या संशयिताने नाकाबंदीच्या ठिकाणी असलेल्या पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करीत झटापट केली. याप्रकरणी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Abusing with police enforcer by man on Dip amavasya)

आकाश रमेश गिरी (३०, रा. अश्वमेधनगर, आरटीओ कॉर्नरजवळ, पंचवटी) अस संशयिताचे नाव आहे. पोलीस हवालदार चंपालाल मगन सुळे यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.४) रात्री दीप अमावस्ये(गटारी) निमित्ताने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात पोलीस ठाणेनिहाय फिक्स पॉईंट नाकाबंदी लावण्यात आलेली होती.

हवालदार सुळे हे अमृतधाम चौक येथील फिक्स नाकाबंदीसाठी नियुक्त होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित आकाश गिरी हा अमृतधाम चौकात आरडाओरडा करीत परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अशांतता पसरवित होता. त्यावेळी हवालदार सुळे यांनी त्यास हटकले असता, संशयिताने त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. (latest marathi news)

तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याशी झटापट केली. यात हवालदार सुळे यांच्या शर्टाच्या बटन तुटले. संशयिताने सरकारी कामात अडथळा आल्याने त्याच्याविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT