Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन मुकबधीर पीडितेवर बलात्कारप्रकरणी आरोपीला दुहेरी जन्मठेप

काळजीवाहक असलेल्या आरोपीने सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी धाराशीव न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व एक लाखांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बालहक्क सुरक्षा सप्ताहानिमित्ताने बाल हक्क समिती व धाराशीव जिल्हा पोलीसांच्या दामिनी पथकाने मुकबधीर मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली असता, त्यावेळी काळजीवाहक असलेल्या आरोपीने सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी धाराशीव न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व एक लाखांचा दंड ठोठावला आहे. (Accused gets double life imprisonment in case of rape of minor Mukbadhir victim)

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक व सध्या नाशिक शहर विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी केला होता. शाहीर नाना अष्टुळ (३४, रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. सदरील घटना ऑक्टोबर २०१९ मध्ये घडली होती. घटनेच्या ४३ दिवसांनंतर या अत्याचाराला वाचा फुटली होती.

बालहक्क सप्ताहादरम्यान वसतीगृहाला धाराशीव जिल्हा पोलीसांचे दामिनी पथक व बालहक्क समितीच्या पथकाने मुकबधीर मुलींच्या वसतीगृहाला २० नोव्हेंबर २०१९ रोजी भेट दिली असता, त्यावेळी विद्यार्थिंनीना विश्वासात घेऊन चौकशी करताना पीडित सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी सदरची आपबिती सांगितली होती. त्यानुसार आरोपीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (latest marathi news)

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला सहायक पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी करीत न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती अंजू शेंडे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. एस.एस. सूर्यवंशी यांनी १७ साथीदार तपासले.

त्यानुसार आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने त्यास न्यायालयाने पोक्सो व बलात्कार या दोन्ही गुन्ह्यात मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच, एक लाखांचा दंडही केला. दंडाची रक्कम पीडितेच्या कुटूंबियांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आरोपी अष्टुळ हा विवाहित असून, पीडितेच्याच वयाची त्यास मुलगी असताना त्याने सदरील कृत्य केल्याने या नराधमास कठोर शिक्षेची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT