Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : अपहारप्रकरणात आरोपीला 7 वर्षांची शिक्षा! हस्ताक्षर तज्ज्ञांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष

Crime News : या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली. सदरचा प्रकार एप्रिल २०१० मध्ये घडला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून तो धनादेश स्वत:च्या खात्यावर वटवून घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली असून, २२ हजारांचा दंडही सुनावला आहे. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली. सदरचा प्रकार एप्रिल २०१० मध्ये घडला होता. (Nashik Crime Accused sentenced to 7 years in embezzlement case)

अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्राच्या पंचवटी शाखेचे ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते.

आरोपी शेख याने ३२ चेक तयार करून त्यावर अकाऊंट पेई असे न लिहिता एका चेकवर स्वत:च प्राप्तकर्ता असे लिहिले. तसेच १६ हजार ४५० रुपयांच्या रकमेत १६ च्या आधी ६ अंक लिहिला. त्यामुळे ६ लाख १६ हजार ४५० रुपयांचा चेक बनवून त्याने तो स्वत:च्या खाते असलेल्या महात्मानगर येथील स्टेट बँक ऑफ बिकानेर ॲण्ड जयपूर येथे वटवून घेत अपहार केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक के. के. पाटील, एस.टी. गायकर यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटल्याची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. (latest marathi news)

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सुनीता चितळकर यांनी ११ साक्षीदार तपासले. यात हस्ताक्षर तज्ज्ञ संतोष कान्हेरी यांनी आरोपीचे हस्ताक्षरांसंदर्भात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. विशेषत: सरकारी वकीलांनी कान्हेरी यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवून घेतली.

आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने शेख यास सात वर्षे साधा कारावास व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील २१ हजार रुपये तक्रारदारास देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT