Nashik Crime News : कर्णकर्कश आवाज करत कॉलेजररोड, गंगापूर रोड या उच्चभ्रू परिसरातील रस्त्यांवर सुसाट बुलेट पळविणाऱ्या चालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कारवाई करताना सात चालकांकडून २१ हजार रुपयांची दंड वसुली केली आहे. तर १५ सायलेन्सर जप्त केले आहेत. गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत बऱ्याच शाळा, महाविद्यालये, नामांकित क्लासेस आहेत. (Nashik Crime action against bullet riders due to noise marathi news)
त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. कॉलेज रोड व गंगापूर रोड भागात बहुतांश शैक्षणिक संस्था असल्याने अनेक विद्यार्थी येथे वास्तव्यासही आहेत. तसेच या भागात नामांकित रुग्णालयेही आहेत. परंतु काही वाहनचालक बुलेट दुचाकीला मॉडिफाइड सायलेन्सर बसवून सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश आवाज करत उपद्रव करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या.
सध्या परिक्षांचा काळ सुरू असल्याने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींसह इतर वाहनांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर कारवाई करण्यात आली.(latest marathi news)
या भागात झाली कारवाई
कॉलेज रोड, महात्मा नगर, गंगापूर रोड, डिके नगर, सावरकर नगर भागात नाकाबंदी करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ बुलेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. तसेच सात वाहनचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई केली. कारवाई केलेली वाहने पोलिस ठाण्यात आणत त्यांचे सायलेन्सर काढले आहे.
जागेवरच शासकीय नियमाप्रमाणे सायलेन्सर बसवल्याशिवाय वाहन सोडले जात नाहीत. तसेच वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईही केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर लावणे दंडनीय गुन्हा आहे. अशाप्रकारे सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कडक कारवाई होणार असल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.