Demotion of API by police commissioner sandip karnik esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर APIला पुन्हा PSI! आयुक्तांचा दणका; वर्षभरासाठी पदावनत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : वर्षभरापूर्वी दाखल गुन्ह्यात संशयिताला तपासात मदत करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकाची वर्षभरासाठी पदावनती करण्याची कठोर कारवाई आयुक्तांनी केली आहे. (Nashik Crime API demotion to PSI again because of bribe)

तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक सागर गंगाराम डगळे हे सध्या शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. ३ मे २०२३ रोजी उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना लाचखोर डगळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती.

त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डगळे यांना अटक केली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातर्फे डगळे यांना निलंबित करण्यात आले. निलंबित कालावधीनंतर त्यांना आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले होते. तसेच याप्रकरणाची आयुक्तांनी विभागीय चौकशीही लावली होती. (latest marathi news)

या चौकशीमध्ये डगळेंकडे ९ गुन्हे व २९ तक्रारी अर्ज प्रलंबित असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आली होती. पोलीस आयुक्तांसमोर झालेल्या चौकशीच्या सुनावणींमध्ये डगळे यांची सहायक निरीक्षक पदावरून एक वर्षांसाठी पदावनत करून पुन्हा उपनिरीक्षक या पदावर काम करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे अधिकारी पदावर असलेल्यांना चांगलाच इशाराच दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT