Aarti Ale & Tejas Garge esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: प्रसुती रजेवर असताना पुरातत्त्वच्या सहायक संचालिकेने स्वीकारली लाच! संचालक पसार: ACBच्या पथकाकडून शोध सुरू

Bribe Crime News : याच विभागाचे संचालक तेजस गर्गे हे मुंबईतून पसार झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : पेठरोडवरील रामशेज किल्ल्यानजिक कंपनी सुरू करण्यासंदर्भात तक्रारदारास पुरातत्त्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तब्बल १ लाख ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिका आरती आळे यांच्या घरझडतीतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती तीन लाखांच्या रोकडसह साडेचार लाखांचे दागदागिने लागले आहेत. तर याच विभागाचे संचालक तेजस गर्गे हे मुंबईतून पसार झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Assistant Director of Archaeology accepted bribe news)

पुरातत्त्व नाशिक विभागाच्या अतिरिक्त सहायक संचालक श्रीमती आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा गोल्ड, राणेनगर, नाशिक), पुरातत्त्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे (रा. महालक्ष्मी रोड, रेसकोर्सजवळ, मुंबई) असे दोघा लाचखोरांची नावे आहेत.

मूळचे गुजरातचे व सध्या नाशिकमधील रहिवाशी असलेले तक्रारदार धनिक हरिभाई लिखिया यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ७) रात्री सदरची कारवाई केली आहे. आरती आळे या नाशिकच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या सहायक संचालक (प्र) म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदार लिखिया हे उद्योजक असून, त्यांना दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामशेज किल्ल्यानजिक खराब टायरवर प्रोसेस करुन ऑईल निर्मिती करण्याची कंपनी सुरु करायची आहे. त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाच्या आरती आळे यांच्याकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.

रामशेज किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असल्याने त्या परिसरात बांधकामासाठी या विभागाची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता होती. मात्र, श्रीमती आळे यांनी याबाबत वेळकाढूपणा केला. सोमवारी (ता. ६) तक्रारदाराने संपर्क साधला असता, श्रीमती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार उद्योजकाने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, सहायक निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या पथकाने श्रीमती आळे यांच्या अनमोल नयनतारा या त्यांच्या राहत्या इमारत परिसरात सापळा रचला.

यावेळी लाचेची रक्कम पंचासमोर स्वीकारतांना श्रीमती आळे यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी (ता. ८) इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी हे करीत आहेत. (Latest marathi New)

प्रसुती रजेवर असताना...

पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिका आरती आळे या सध्या प्रसुती रजेवर आहेत. तर आठ दिवसांपूर्वीची त्यांची प्रसुती झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात लाचप्रकरणी गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घरझडती घेतली असता, घरातून ३ लाख १० हजारांची रोकड व ४ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने असा ऐवज हाती लागला आहे. बँकखात्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीमती आळे यांची प्रसुती झालेली असल्याने त्यांना कायदेशीर नोटीस बजावत त्यानुसार तपासात त्यांना सहकार्य करावे लागणार आहे.

संचालक गर्गेही अडकले

पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे हेदेखील या गुन्ह्यात अडकले आहेत. आरती आळे यांनी लाचेची दीड लाखांची रक्कम स्वीकारल्यानंतर संचालक गर्गे यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या हिश्श्याच्या रकमेबाबत विचारले होते. त्यावरून त्यांची लाचेला संमती असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या अटकेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक मुंबईत गेले परंतु संशयित गर्गे पसार झाले होते. त्यांचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेऊन कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT