Seized truck esakal
नाशिक

Nashik Crime: अडीच लाखांचे गोवंश मांस पकडले! नाशिक पुणे महामार्गावरून वाहतूक; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जागरूकता

Crime News : नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर मुंबईच्या दिशेने गोवंश मांसाची वाहतूक करणारी पिकअप जीप वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पकडण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वावी : नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर मुंबईच्या दिशेने गोवंश मांसाची वाहतूक करणारी पिकअप जीप वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पकडण्यात आली. अडीच लाख रुपये किमतीचे सुमारे 2500 किलो मांस वावी पोलिसांनी जप्त केले असून एकास अटक केली आहे. (Nashik Crime Beef caught Nashik Pune Highway marathi news)

वावी येथील बजरंग दलाचे पदाधिकारी धनंजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर येथून मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी पिकअप जीप एमएच 03 डीव्ही 1799 बाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे इंटरचेंज येथे संगमनेर बाजू कडून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवले होते.

रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सदर पिकप जीप कार्यकर्त्यांच्या दृष्टीस पडली. तुझी रस्त्यात अडवून तपासणी केली असता आत मध्ये जनावरांचे मांस आढळून आले. ताडपत्रीच्या खाली बर्फामध्ये हे मांस झाकून ठेवण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी चालक शहाबान हुकुम अली शहा वय 42 वर्षे रा. नालासोपारा मुंबई यास सदर वाहन वावी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले.

नांदूर शिंगोटे वावी रस्त्याने फुलेनगर शिवारात आल्यानंतर पिकअप जीप चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बजरंग दल कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या 112 हेल्पलाइन क्रमांकावर माहिती दिल्यानंतर वावी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राजू चौधरी, विक्रम लगड यांनी पाठलाग करून ती जीप साई भक्त निवास समोर ताब्यात घेतली. (Latest Marathi News)

पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत गाडीत असलेल्या माणसाची तपासणी केली असता ते जनावरांचे असल्याचे आढळून आले. मांस वाहतूक परवाना बाबत चालकाला विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

पिकअप जीप मधून सुमारे अडीच टन गोवंश मांस पोलिसांनी जप्त केले. बजरंग दल कार्यकर्ता धनंजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात जीप चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरिक्षक संदेश पवार यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरिक्षक देवीदास लाड याप्रकरणी तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: शम्स मुलानीच्या ६ विकेट्स! मुंबईकडे ३१७ धावांची आघाडी, ओडिसाला दिला फॉलो ऑन

Narendra Modi: लोकसभेचा धसका? तब्बल 49 मिनिटे भाषण, फक्त काँग्रेस, काँग्रेस अन् काँग्रेस! महायुतीसाठी पंतप्रधान अॅक्शन मोडमध्ये

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : जुन्नर पोलिसांनी साडेतीन लाखाच्या ३५ मोबाईलचा घेतला शोध

Solapur Assembly Election : तुतारी ते ट्रम्पेट : बार्शी वगळता 'या' 10 मतदारसंघात 'ट्रम्पेट'; कोणाची चालणार जादू?

SCROLL FOR NEXT