Suspension  esakal
नाशिक

Nashik Crime : तक्रारदारास चापट मारणारा भद्रकाली ठाणे अंमलदार निलंबित! आयुक्तांचा दणका; तक्रारदारांशी सौजन्यानेच वागा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : परजिल्ह्यातून आलेल्या तक्रारदाराची बॅग शालिमार परिसरातून चोरीला गेली असता, तो भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेला. ठाणे अंमलदाराने तक्रार नोंदविण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत त्यास चापटही मारली. त्यामुळे दुखावलेल्या तक्रारदाराने थेट पोलिस आयुक्तालय गाठत आपबिती सांगितली.

त्याची गंभीर दखल घेत आयुक्त संदीप कर्णिक यांनी कर्तव्यात कसूर व शिस्तभंगाचा ठपका ठेवत अंमलदारावर निलंबनाची कारवाई केली. यामुळे पोलिस दलाला ‘तक्रारदारांशी सौजन्याने वागा’ असा इशारावजा संदेश मिळाला आहे. (Bhadrakali thane officer who slapped complainant suspended)

हवालदार योगेश जालिंदर ढमाले असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोलापूर येथील रहिवासी संतोष बालाजी गंजी (५३) हे धार्मिक विधीसाठी नाशिक येथे आले असता, रविवारी (ता.२९) सकाळी नऊला शालीमार परिसरातून त्यांची बॅग चोरीला गेली.

त्यामुळे गंजी यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठले असता, ठाणे अंमलदार ढमाले यांनी तक्रार घेण्याऐवजी गंजी बॅग चोरीला गेली त्याच ठिकाणी पाठविले आणि तिथे पोलिस येतील असे सांगितले. त्याप्रमाणे गंजी त्याठिकाणी जाऊन दोन तास थांबले, तरीही पोलिस न आल्याने ते पुन्हा पोलिस ठाण्यात आले.

त्यावेळी ठाणे अंमलदार ढमाले यांनी, तुझी बॅग सापडणार नाही, असे म्हणत त्यांना चापट मारून हाकलून लावले. या घटनेमुळे दुखावलेल्या गंजी यांनी थेट पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष गाठून आपबिती सांगितली. नियंत्रण कक्षातून सूचना केल्यानंतर ते पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. परंतु पुन्हा अंमलदारांनी वेळकाढूपणा केला.

त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदार गंजी यांनी त्यांचे धार्मिक कार्य उरकल्यानंतर सोमवारी (ता.३०) आयुक्तालय गाठून परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट घेत आपबिती सांगितली. याची गंभीर दखल घेत उपायुक्त चव्हाण यांनी चौकशी करीत त्यात तथ्य आढळल्यानंतर माहिती आयुक्त कर्णिक यांच्यासमोर मांडली. आयुक्तांनीही गंभीर दखल घेत निलंबनाचे आदेश जारी केले.

तक्रारदारांना नेहमीचाच अनुभव

आयुक्तालय हद्दीमध्ये मोबाईल, बॅग, दागिने, दुचाकी चोरीच्या घटना सतत घडतात. परंतु तक्रारीसाठी आलेल्यांची तत्काळ नोंद होतेच असे नाही. उलटपक्षी तक्रारदारांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते. तसेच, बऱ्याचदा तक्रारदारांशी अरेरावीचीच भाषा वापरली जाते. त्यामुळे तक्रारदार पोलिस ठाण्याची पायरी चढण्यास धजावत नाहीत.

तर, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस-नागरिकांमध्ये सुसंवादाचे आवाहन केले जाते. उपक्रम राबविले जातात. परंतु तरीही तक्रारदारांना पोलिस ठाण्यात येणारा अनुभव त्या विपरीत असल्याचेच या प्रकरणातून पुन्हा समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Classical Language: एका लढ्याला यश...! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Marathi Language: अखेर आज तो सुदिन अवतरला; मी मुख्यमंत्री असताना...मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ; Babar Azam चा काल राजीनामा अन् आज खेळाडूची निवृत्ती

Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

SCROLL FOR NEXT