Nashik Crime News : एका मॅनेजमेंट कंपनीमध्ये कामास असलेल्या कर्मचाऱ्यास सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात दुचाकी अडवून त्यास मारहाण करत त्याच्याकडील सात लाख ५३ हजार रुपये रोख रक्कम व दुचाकी लांबविणाऱ्या आठ जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करत संशयितांकडून चोरलेली रक्कम हस्तगत करत गुन्ह्यात वापरलेल्या कार, दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ( Biker robbery gang jailed by MIDC Police )
२९ जुलै २०२४ ला रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनी (चेन्नई) च्या पुणे शाखेत कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला असलेला सागर नंदू चौधरी हे सिन्नर शहर व ग्रामीण भागातील मॉल, व्यावसायिक यांनी दिलेली बँक भरणा करावयाची रक्कम तसेच ग्राहक बँकांचे धनादेश घेऊन दुचाकीवरून जात होता. तो मोहदरी घाटात आल्यावर पाठीमागून आलेल्या विना क्रमांकाच्या दोन दुचाकी वरून आलेल्या सहा जणांपैकी एकाने त्याच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला तर इतरांनी हॉकी स्टीक व लाथा बुक यांनी त्यास मारहाण करत त्याच्याजवळ असलेली सात लाख ५३ हजार ४१६ रुपये रोख रक्कम व धनादेश असलेली बॅग हिसकावून घेत त्याचीच दुचाकी घेऊन पसार झाले होते.
याप्रकरणी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर या गुन्ह्याचा तपास करत होते. तर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एक पथक व गुन्हे शाखेचे दुसरे समांतर तपास करत होते. फिर्यादी चौधरी हा सिन्नर शहरातील ज्या ग्राहकांकडे रोख रक्कम व धनादेश जमा करण्यासाठी जात होता.
त्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र चौधरी याच्या मागावर कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले होते. गुन्हा करणाऱ्यांनी चौधरी यांची नाशिककडे जाण्याची वेळ निश्चित करून मोहदरी घाटात त्यांच्यावर हल्ला केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिस निरीक्षक श्री. बाविस्कर यांना खबऱ्यामार्फत गुन्ह्यात सहभाग असलेल्या अमोल अरुण ओढेकर (रा. शिंदेगाव) व शुभम विजय पवार (रा. पळसे) या दोघांची नावे समजली. (latest marathi news)
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांची नावे सांगितली. पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच गुन्हे शाखेकडील तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदीप बहिराम, हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली.
या संशयितांना अटक
पोलिसांनी या गुन्ह्यातील महेश सतीश पठारे (रा. विंचुर ता. निफाड), गौरव प्रभाकर भवर (रा.मानोरी खुर्द ता. निफाड), सागर एकनाथ चव्हाण (रा. विंचूर ता. निफाड), प्रसाद आनंदा गायकवाड (रा. मानोरी बु. ता. येवला), गणेश रमेश गायकवाड (रा.मानोरी खुर्द ता. निफाड), सूरज प्रकाश पाकळ (रा.शिर्डी ता. राहता) यांना अटक केली. गुन्ह्यात संशयितांनी दोन दुचाकी व एक चारचाकी वापरल्याचे सांगत चोरलेली रोख रक्कम सात लाख ५३ हजार रुपये त्यांनी सर्वांमध्ये वाटून घेतल्याचे सांगितले.
दोघे सराईत
संशयित आरोपी महेश पठारे याच्यावर लासलगाव पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच सुरज पाकळ याच्यावर नगर जिल्ह्यात फसवणूक, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.