Mangala Bhandari esakal
नाशिक

Nashik Crime News : भाजपची पदाधिकारी मंगला भंडारीला भावासह अटक; पेन्शनच्या नावाखाली उकळले 9 लाख

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकरोड येथील दत्त मंदिर सिग्नलजवळील इमारतीत ‘महिला सशक्तीकरण व भंडारी ग्लाेबल सर्व्हिसेस’ नावाचे खासगी कार्यालय थाटून गोरगरिब व सर्वसामान्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ व पेन्शन मिळवून देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याऱ्या भाजपाची महिला पदाधिकारी मंगला भंडारी यांना तिच्या भावासह अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे. (BJP Mangala Bhandari was arrested along with his brother)

मंगला सतीष भंडारी (४६, रा. गुलमोहोर कॉलनी, आनंदनगर, नाशिकरोड), संजय संभाजी भालेराव (४०, रा. गौळाणे रोड, पाथर्डी फाटा) असे दोघा संशयितांची नावे असून, उपनगर पोलिसांनी ‘भंडारी ग्लाेबल सर्व्हिसेस’च्या कार्यालयातून संगणक, लॅपटॉप जप्त करुन त्यातील डाटा मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला.

सर्वसामान्य व गरजू गोरगरिब महिलांना शासनाच्या कल्याणकारी याेजनांसह कमी-अधिक रकमेची थेट सरकारी पेन्शन सुरु करुन देण्यासाठी भाजप पदाधिकारी व घरकाम मोलकरीन संघटनेची अध्यक्ष मंगला भंडारी, तिचा भाऊ संजय भालेराव या दाेघांनी १५०० महिला अर्जदारांकडून प्रत्येकी ६५० रुपयांप्रमाणे एकूण ९ लाख ७५ हजार रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासात समाेर आले आहे.

चैताली प्रकाश गवांदे (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल हाेताच पोलिसांना दोघांना अटक केली आहे. त्यांनी नाशिकराेडच्या दत्त मंदिर सिग्नलजवळील इमारतीत ‘महिला सशक्तीकरण व भंडारी ग्लाेबल सर्व्हिसेस’ नावाचे खासगी कार्यालय थाटून गोरगरिबांना स्कीम दिल्याचे उघड झाले आहे.

तसेच, संगनमत करुन नाशिक शहर, येवला, त्र्यंबक, सिन्नर, घाेटी व अन्य तालुक्यांतील गाेरगरिब महिला व आदिवासीबहुल परिसरातील महिलांना शासकीय याेजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, असे सांगत ‘वैयक्तिक कार्यालयीन कामकाज’च्या नावाखाली ६५० रुपयेप्रमाणे पैसे उकळले आहेत. त्याच्या नाेंदी खासगी रजिस्टरमध्ये करत कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज संबंधित शासकीय विभागाकडे जमा करुन लाभ दिला जाईल, असे संशयित सांगायचे. तपास उपनिरीक्षक प्रभाकर साेनवणे करीत आहेत.

आयुक्तांनी दबाव झुगारला

दरम्यान, संशयित मंगला भंडारी हिने पोलिस कारवाई टाळण्यासाठी ‘राजकीय दबाव’ पोलिसांवर आणण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकरण समजून घेत कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्याने उपनगर पोलिसांनी धडक कारवाई करीत तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT