Nashik News : पोलिसांनी शुक्रवारी (ता. २६) घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजाराचे अड्डे उद्ध्वस्त केले. म्हसरूळ, आडगाव पोलिसांनी दोन ठिकाणी छापे मारुन मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु शहरात अन्य ठिकाणीही असे अड्डे राजरोस सुरू असून ते अड्डेही उद्ध्वस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. (Black market of domestic gas cylinders)
नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कैलासनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे अड्डे असल्याची खबर मिळाली होती. आडगाव पोलिसांनी या अड्ड्यावर शुक्रवारी छापा टाकला आणि घटनास्थळावरून ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आठ घरगुती गॅस सिलिंडर, चार रिकामे सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार व वजनकाटा असा मुद्देमाल जप्त केला.
संशयित किरण किशोर ठोंबरे (३०) याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा आडगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, म्हसरूळ हद्दीतील अश्वमेधनगर येथेही घरगुती गॅस सिलिंडरचा अड्डा असल्याची खबर मिळताच, म्हसरूळ पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गॅसचा भरणा सुरू होता.
संशयित विकी नरसिंग ठाकूर (१८), ओंकार भगवान परमार (१९) यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात वजनकाटा, रिक्षा, पाच रिकामे सिलिंडर व काही भरलेल्या सिलिंडरचा समावेश आहे. (Latest Marathi News)
उपनगरांमध्येही अड्डे
म्हसरूळ, आडगावप्रमाणेच अंबड, सातपूर, नाशिक रोड, इंदिरानगर ठाण्यांच्या हद्दीतही अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजाराचे अड्डे आहेत. या अड्ड्यांवर बहुतांशी घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांची वाहने जातात. परंतु वितरकांकडून अद्याप कधीही याची शहानिशा केली जात नाही. मात्र याचा भूर्दंड मात्र हकनाक ग्राहकांना बसतो. तसेच, पुरवठा कंपन्यांकडूनही अशा काळाबाजाराचा चाप बसावा म्हणून कोणतेही नियंत्रण नसल्याचा फायदा संशयित घेतात.
कारवाईवरून तू-तू-मै-मै
आडगाव, म्हसरूळ येथील काळाबाजार अड्ड्यांवरील पोलिसांनी केलेली कारवाईही संशयास्पद असल्याची चर्चा आहे. पोलिसांना अड्ड्यांची कल्पना देऊनही कारवाई विलंबाने केली गेली. त्यामुळे काही अड्ड्यांवर पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तर अन्य अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतरही पंचनामा व गुन्हा दाखल करण्यावरून दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये तू-तू-मै-मै झाल्याचीही चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.