Dilip Sonavane esakal
नाशिक

Nashik Crime: पार्टी केली अन् डोक्यात दगड घालून गेले; चिंचोली गुरव येथून बेपत्ता तरुणाचा मृतदेह सिन्नरच्या कहांडळवाडीत सापडला

Crime News : एकमेकांचे सख्खे मावसभाऊ असलेले असलेले ते दोघेजण आणखी एका मित्रासमवेत 31 मार्च च्या सकाळी पोल्ट्रीवर खत भरायला जातो असे सांगून गेले अन...

सकाळ वृत्तसेवा

वावी : एकमेकांचे सख्खे मावसभाऊ असलेले असलेले ते दोघेजण आणखी एका मित्रासमवेत 31 मार्च च्या सकाळी पोल्ट्रीवर खत भरायला जातो असे सांगून गेले. मात्र चार दिवसांपासून त्यांचा कोणाचाच पत्ता लागत नव्हता. संशयावरून एकाच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दिली.

आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या जवळच तिघांनी एकत्र मद्यपान करून पार्टी केल्याचे पुरावे देखील मिळाले. (Nashik Crime body of missing youth from Chincholi Gurav found in Kahandalwadi news)

सिन्नर आणि संगमनेर या तालुक्यांच्या सरहद्दीवरील चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दिपक भाऊसाहेब सोनवणे (36) हा 31 मार्चच्या सकाळी नऊ वाजता गावातच राहणारा मावस भाऊ कृष्णा ऊर्फ पोपट जालींदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट रा. चास, ता सिन्नर यांच्यासोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो सांगून घराच्या बाहेर पडला होता.

मात्र संध्याकाळी नेहमीच्या वेळी घरी परत आला नाही. सलग तीन दिवस त्याचा व त्याच्यासोबत असलेल्या दोघांचा थांगपत्ता लागत नसल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. त्याच्यासोबत असलेल्या दोघांचे मोबाईल फोन बंद होते. त्यांनी देखील दोन दिवस त्यांच्या घरी संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते.

बुधवारी सकाळी चिंचोली गुरव-वावी रस्त्यावर कहांडळवाडी शिवारात पोल्ट्रीवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना एका पडीत शेतातून काटेरी बाबळीच्या वाळलेल्या फासाआडून प्रचंड दुर्गंधी आली. या भागात शेतकरी पोल्ट्री फार्ममध्ये मृत झालेल्या कोंबड्या टाकत असतात.

त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कामगारांना मात्र ही दुर्गंधी काहीशी वेगळी जाणवली. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता मानवी मृतदेह आढळून आला. ही बाब पोलीस पाटील रवींद्र खरात यांच्या माध्यमातून वावी पोलीस ठाण्यात कळविण्यात आली. (latest marathi news)

तोपर्यंत चिंचोली गुरव येथे देखील अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळल्याचे समजले होते. शिवेवरच असलेल्या नातेवाईकांनी तेथे धाव घेतली. मृतदेह दिलीपचा असल्याचे सर्वांनी ओळखले. मात्र त्याचा चेहरा दगडांनी ठेचल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. घातपात करून तीन दिवस उलटल्यामुळे मृतदेहावर अक्षरशा किडे वळवळत होते.

वावीचे सहाय्यक पोलीस संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र हा प्रकार खूनाचा असल्यामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालय व तिथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला.

सदर घटना घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते. पोलिसांना मृतदेहाच्या जवळच तिघांनी मद्यपान केल्याचे पुरावे मिळून आले. रक्ताने भरलेले दगड, झटपट झाल्याच्या खूना देखील मिळाल्या. मृतदेह उघड्यावर ओळखू येऊ नये म्हणून बाजूला असलेला काटेरी झुडपांचा फास टाकून अर्धवट झाकण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीयुक्त वास मेलेल्या कोंबड्यांचा वाटला असावा.

मयत दीपकचे भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात कृष्णा जाधव व अजय शिरसाट यांचे विरोधात अज्ञात कारणासाठी भावास मारहाण करून त्याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून दोघा संशयतांचा शोध घेण्यात येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT