Burglary Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : सुट्ट्यांपूर्वीच शहरात घरफोडीचे सत्र! आयुक्तालय हद्दी घरफोड्या; सव्वासात लाखांचा ऐवज चोरीला

Crime News : अजून उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला नाही मात्र घरफोड्यांनी लवकरच संधी साधून बंद घरावर संधी साधून घरफोड्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर पोलीस निवडणुकीच्या बंदोबस्तासह अवैध धंद्यांविरोधात कारवाईत व्यस्त असताना, दुसरीकडे चोरट्यांनी भरदिवसा बंद घरांचे कडीकोयंडे तोडून घरफोड्या करीत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. आयुक्तालय हद्दीत पाच घरफोड्यातून सुमारे साडेसात लाखांचा दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

दरम्यान, अजून उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला नाही मात्र घरफोड्यांनी लवकरच संधी साधून बंद घरावर संधी साधून घरफोड्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. (Nashik Crime Burglary in commissionerate boundaries news)

महेश मधुकर पवार (रा. सुविनित रेसीडेन्सी, शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन ते सायंकाळी सात या वेळेत त्यांचा व त्यांच्या शेजारील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरातील तब्बल ५ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

तर, मनोहर सोमनाथ गवळी (रा. आकांक्षा पार्क, मखमलाबाद शिवार, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १५) सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान त्यांचा फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडला आणि लॅपटॉप, सोन्याचे मंगळसूत्र, पोत असा ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज पृथ्वीराज कुमावत (रा.शिवबालाजी अपार्टमेंट, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १४) सकाळी ७ ते सोमवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ५५ हजारांचे सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुर शेखर भगत (रा. भगत भवन, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.१५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख २४ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (latest marathi news)

पाचही घरफोड्या भरदिवसा

आयुक्तालय हद्दीत सोमवारी (ता. १५) दिवसभरात पाच घरफोड्यांच्या घटना घडल्या. यात म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घडना घडल्या असून, एका गुन्ह्यात तर एकाच इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. भरदिवसा झालेल्या घरफोड्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

सुट्ट्यांपूर्वीच संधी

शाळांना सुट्ट्या लागल्या असल्या तरी १ मे रोजी शाळेचा निकाल असतो. तोपर्यंत मुले उन्हाळी शिबिरांना जातात वा लग्नसराईतचे दिवस असल्याने कुटूंबियांसह लग्नांना जात. मे महिन्यात मुलांना सुट्ट्या असतात. त्यावेळी बहुतांशी कुटूंबिय गावी वा उन्हाळी सहलीला जातात. या काळात घरफोड्या वाढत असतात. मात्र यावेळी चोरट्यांनी सुट्ट्यांपूर्वीच बंद घरांवर तोही भरदिवसा डल्ला मारण्याची संधी साधली आहे.

बंद घरांवर डोळा

चोरट्यांकडून बंद घरांची रेकी करून चोऱ्या-घरफोड्या केल्या जातात. परिसरांमध्ये दिवस-रात्र पोलीस गस्ती पथके असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरीही चोऱ्या-घरफोड्या, जबरी चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस गस्तीचा दावा फोल ठरत असल्याचे यामुळे अधोरेखित होते आहे.

"नागरिकांनी घरामध्ये मौल्यवान ऐवज, जास्तीची रोकड न ठेवता बँकेत ठेवावी. जेणेकरून आपला ऐवज सुरक्षित राहील. इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. सुरक्षारक्षक असेल तर त्याने येणार्या-जाणार्यांकडे चौकशी केली पाहिजे. शेजारी राहणाऱ्यांनीही सतर्कता बाळगली पाहिजे. घरफोड्यांबाबत पोलीस तपास करीत आहेत."

- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT