Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: कारची काच फोडून लॅपटॉप लंपास; भरदिवसा स्मार्टरोडवर घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्मार्ट रोडवर रस्त्यालगत पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह बँक लंपास (Theft) केल्याचा प्रकार शनिवारी (ता. १७) भरदिवसा घडली. दीपक आहेर (रा. कळवण) यांच्या फिर्यादीनुसार, ते शनिवारी (ता. १७) काही कामानिमित्ताने नाशिकला आले होते. (Nashik Crime Car window broken and laptop looted incident on Smart Road in broad daylight marathi news)

त्यांची कार (एमएच १५ एचक्यु ७०९०) त्यांनी स्मार्ट रोडवरील महिला बँकेसमोर पार्क केली होती. अवघ्या २० मिनिटांमध्ये ते परत आले असता, त्यांच्या कारच्या चालकामागील बाजूची काच फोडलेली दिसून आली. कारच्या मागच्या सीटवर असलेली लॅपटॉपची बॅग संशयितांनी लंपास केली होती.

बॅगेत लॅपटॉप, दहा हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्रे होती. सदरची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा आणि रहदारीच्या रस्त्यावर सदरची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates : पुण्यात पाणाच्या डबक्यात पडून तरुणाचा मृत्यू

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT