Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : ‘धर्मादाय’च्या लिपिकासह एक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Bribe Crime : लाच स्वीकारताना दोघा लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मंगळवारी (ता. १) रंगेहाथ अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना दोघा लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मंगळवारी (ता. १) रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. धर्मादाय सहआयुक्तालयातील न्याय लिपिक सुमंत सुरेश पुराणिक (वय ४०, रा. श्री निधी बंगला, डीजीपीनगर- १, रेयॅान स्कूलजवळ, नाशिक-पुणे रोड), लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर (४७, रायगड चौक, सिडको) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. ( charity clerk in bribe trap )

तक्रारदारांकडे नवीन दाखल फायलीच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणूक न करणे, निकाली फाइल नकला विभागाला विहित वेळेत पाठविणे, पुढील सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलदगतीने करून देण्याच्या मोबदल्यात लाचखोर पुराणिकने २३ सप्टेंबरला २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार लाच देण्याचे ठरले. यासाठी लाच मागणीस लघुलेखक बाविस्कर याने प्रोत्साहन दिले होते.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, शहानिशा करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (ता. १) द्वारका येथील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सापळा रचण्यात आला. शासकीय कार्यालयात पंच व साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कामगिरी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांनी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT